Headlines

तरुणांसाठी क्रीडास्वप्नांना नवी दिशा’; मिनी क्रीडा संकुलाचा शुभारंभ…

पालकमंत्री नितेश राणेंचा पुढाकार; टप्प्याटप्प्याने आधुनिक सुविधा उभारणार.. ⚡देवगड ता.०२-:देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत मिनी क्रीडा संकुलाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे देवगड शहरात क्रीडा क्षेत्राला नवे बळ मिळणार असून स्थानिक तरुण-तरुणींना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.यावेळी बोलताना ना. नितेश राणे यांनी सांगितले की, हा प्रकल्प पहिल्या टप्प्यात सुरू…

Read Full News

आरोस ग्रामस्थांचे रस्त्याबाबतचे आमरण उपोषण अखेर स्थगित…

संबंधितांनी २० मे पर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिल्याने उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित.. ⚡सावंतवाडी ता.०२-: २० मे पर्यंत काम करण्याचे लेखी आश्वासन घेऊनच तात्पुरत्या स्वरूपात आरोस ग्रामस्थांचे रस्त्याबाबतचे उपोषण स्थगित करण्यात आले.आरोस येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील “साटेली मुख्य रस्ता ते कळंगुटकरवाडी” रस्त्याच्या अक्षम्य दिरंगाईबाबत ,आरोस येथील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते सुरेश देसाई व ग्रामस्थांनी, १…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्याचा बारावी 2026 परीक्षेचा निकाल 97.97 टक्के…

बा.म. गोगटे कनिष्ठ महाविदयालय शिरोडाची गायत्री लक्ष्मण वारगावकर तालुक्यात प्रथम.. ⚡वेंगुर्ला ता.०२-: फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (बारावीचा )वेंगुर्ला तालुक्याचा बारावी परीक्षा 2026 चा ऑनलाईन निकाल आज शनिवारी 2 मे रोजी जाहीर झाला आहे.तालुक्यातील एकूण 4 कॉलेजमधील एकूण 641प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 628विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल 97.97टक्के इतका लागला आहे. यामध्ये…

Read Full News

शेर्ले येथे तेरेखोल नदीकाठी गणेश घाटाचे संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न…!

⚡बांदा,ता.०२-:शेर्ले येथील तेरेखोल नदी परिसरात गणेश घाट बांधकामाच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य महेश धुरी, सरपंच सौ. प्रांजल जाधव, माजी सरपंच उदय धुरी, दयानंद धुरी, उपसरपंच दीपक नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्रावणी धुरी, वासुदेव धुरी, गुरु सावंत, युवासेना तालुकाप्रमुख रियाज…

Read Full News

खासकील वाड्यात मध्यरात्री एमएनजीएलची बेदरकार खोदाई…

पाणीपुरवठा पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया: नगरसेवक संजू परब, अशी सुभेदार यांची घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना धरले धारेवर… सावंतवाडी, दि-०२:- सावंतवाडी शहरातील खसकीलवाडा–शिल्पाग्राम परिसरात मध्यरात्रीनंतर घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एमएनजीएल कंपनीकडून रात्री उशिरा सुमारे १२ नंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता खोदाई करण्यात आली. या बेदरकार कामामुळे नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला…

Read Full News

बांदा येथे शिवसेना ठाकरे गटाची संघटनात्मक बैठक संपन्न …

⚡बांदा ता.०२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी बांदा येथे कार्यकर्त्यांची भेट घेत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या. आगामी स्थानिक राजकारण, गावागावातील संघटनात्मक बांधणी तसेच युवक व महिला पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागावर त्यांनी विशेष भर दिला.यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी शिवसेनेचे विचार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धोरण तळागाळातील नागरिकांपर्यंत…

Read Full News

उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब यांना मातृशोक…!

⚡मालवण ता.०२-:मसुरे चांदेरवाडी येथील द्रोपदी दत्ताराम मुळीक परब वय( 95 )वर्ष यांचे बुधवारी संध्याकाळी उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी रात्री मसुरे चांदेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रीमती द्रौपदी यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते.थोर माजी सैनिक दत्ताराम मुळीक परब यांच्या त्या वीर पत्नी होत्या. गावातील अनेक कुटुंबांना त्यांचा…

Read Full News

कळसुलकर हायस्कूल मध्ये प्रा. रमेश चिटणीस यांचा स्मृतिदिन साजरा…

⚡सावंतवाडी ता.०२-: कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे हायस्कूलच्या सभागृहामध्ये काल शुक्रवारी कै. प्राध्यापक रमेश चिटणीस सर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.मान्यवरांच्या उपस्थितीत रमेश चिटणीस सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गौरांग चिटणीस, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, पालक विक्रम कोटणीस, प्रशालेचे…

Read Full News

साक्षी रामदुरकरने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत पटकावला चौथा क्रमांक…

⚡सावंतवाडी ता.०२-: डोंबिवली, ठाणे येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाने स्वर्गीय जान्हवी सुनील मोरे स्मृतिप्रित्यर्थ सोळा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेचे उदघाटन आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौतीस मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला. मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकर हीने उत्कृष्ट खेळ करत चौथा क्रमांक मिळवला. आंतरराष्ट्रीय…

Read Full News

बांद्यात ‘कला आंगण महोत्सव २०२६’ उद्या…

⚡बांदा ता.०२-: विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या वतीने संस्थेचा २० वा वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक ३ मे रोजी गुढीपूर पिंगुळी येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “कला आंगण महोत्सव २०२६” मध्ये विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता ठाकर समाजाच्या…

Read Full News

You cannot copy content of this page