Headlines

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका…

⚡मालवण, ता.०३-: परिमंडळ मालवण अंतर्गत नियतक्षेत्र कांदळगाव येथील मौजे बुधवळे मळेशेत परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या पथकाने रविवारी रात्री यशस्वी सुटका केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.स्थानिक ग्रामस्थ श्री. राजू मुणगेकर व श्री. संदिप बुधवळेकर यांनी रात्रीच्या सुमारास विहिरीत बिबट पडल्याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ…

Read Full News

सोनुर्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व उपक्रम उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.०३-:​सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि महिलांचा गौरव करण्यात आला. ​​कार्यक्रमा निमित्त २८ एप्रिल २०२६ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. यामध्ये ​पहिली ते चौथी गट: प्रथम- युवराज…

Read Full News

छ. संभाजी महाराजांचा इतिहास हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान : विशाल परब…

⚡वेंगुर्ला ता.०३-: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नवीन पिढीसमोर यावे यासाठी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब आणि वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांचा पुढाकार, भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब आणि वेदिका परब यांच्या हस्ते“इथे ओशाळला मृत्यू”या नाटकाचे उद्घाटन वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात संपन्न झाले.त्याग आणि असीम बलिदानाचा रोमांच अंगावर उभा करणारा ऐतिहासिक नाट्यप्रयोग दिमाखदार वातावरणात संपन्न झाला….

Read Full News

देव मुंबरेश्वर मुंब्रादेवी देवस्थानाला ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देऊ:पालकमंत्री नितेश राणे…

⚡देवगड ता.०३-:देवगड तालुक्यातील मीठमुंब्री मधलीवाडी येथे देव मुंब्रेश्वर मुंब्रादेवी ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे बंदर व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की. या देवस्थानाच्या उभारणीत मुंबईपासून सिंधुदुर्ग-देवगडपर्यंत सर्वांचे मोठे योगदान आहे, हे त्यांनी…

Read Full News

पत्रकार सन्मान कार्यक्रमात मंत्र्यांचा ग्रामीण पत्रकाराकडून असाही सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.०३-:सावंतवाडी तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी संपन्न झाला. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नितेश राणे यांनासावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य नीलेश परब यांनी श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा भेट देऊन नेत्याचा आदर केला. त्यांच्या या विशेष उल्लेखनीय कृतीचे सावंतवाडी तालुक्यातून कौतुक करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्गजिल्हा बँक अध्यक्ष मनीष…

Read Full News

मठ येथे कारला अपघात ; कारचे मोठे नुकसान…

⚡वेंगुर्ला ता.०३-: तालुक्यातील मठ श्री देव बादेश्वर मंदिर नजीक वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्गांवर आज रविवारी सकाळीच एका कारला अपघात होऊन कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर कार विद्युत पोलवर आदळल्याने नुकसान झाले आहे. गोव्याहून वेंगुर्ला कुडाळ देवगडकडे जाणाऱ्या या कारला चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते. सुदैवाने कारमधील चार जणांना किरकोळ दुखापत झाली…

Read Full News

रेडी हुडावाडी येथील “तो” धोकादायक लोखंडी विद्युत पोल अखेर बदलला…

⚡वेंगुर्ले ता.०२-: तालुक्यातील रेडी हुडावाडी येथील श्री देव सत्यपुरुष मंदिराजवळील रस्त्याच्या बाजूलाच वळणावर धोकादायक स्थितीत लोखंडी विद्युत पोल पूर्णतः गंजून गेल्याबाबतची बातमी प्रसिद्ध होताच ,संबंधित विभागाला जाग येत तो गंजलेल्या स्थितीत असलेला लोखंडी विद्युत पोल बदलला.सदरील गंजलेल्या स्थितीतील तो लोखंडी पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडली असती.भर वस्तीत आणि रस्त्याच्या अगदी बाजूलाच…

Read Full News

दोडामार्ग तालुक्यात बारावी निकालाचा जल्लोष; संचित परब तालुक्यात प्रथम…

भेडशी कॉलेजची वाणिज्य शाखेतून सोनिया गवस अव्वल.. ⚡दोडामार्ग ता.०२-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (फेब्रुवारी 2026) परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, दोडामार्ग तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल यंदा 93 टक्के लागला असून, एकूण 155 विद्यार्थ्यांपैकी 144…

Read Full News

पाट हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न…

⚡कुडाळ ता.०२-: एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय पाट, कै सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालय तथा कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत…

Read Full News

आई आणि मुलगी एकाच वेळी बारावी उत्तीर्ण…

४८ व्या वर्षी अंगणवाडी सेविकेची गगनभरारी.. ⚡कणकवली ता.०२-:‘शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते’ हे कळसुली येथील सौ. वैभवी हेमंत वारंग यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आई आणि मुलगी एकाच वेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून, या माय-लेकींनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सौ. वैभवी वारंग या कुडाळ तालुक्यातील पोखरण येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत….

Read Full News

You cannot copy content of this page