Headlines

वेंगुर्ला तालुक्यात पुन्हा पेट्रोलची गंभीर टंचाई…

परुळेत पेट्रोल उपलब्ध असल्याने नागरिकांतून समाधान.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यात सोमवार 4 एप्रिल रोजी पेट्रोल पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ठराविक दिवसानंतर पुन्हा पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याने वाहनधारकांची तारांबळ होत आहे. वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील पेट्रोलपंपावर सोमवारी दुपारी 12.30 वा. पासून पेट्रोलचा साठा संपल्याने एकच समस्या निर्माण झाली. तर डिझेल, सीएनजि पुरवठा सुरु…

Read Full News

वाफोलीत सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांचा सत्कार…

⚡बांदा ता.०४-: श्री देवी माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाफोली गावात पिंपळेश्वर युवक मंडळ (मधलीवाडी) व ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच बांदा–वाफोली ग्रामीण मार्ग क्रमांक ९३ च्या काँक्रीटीकरण व काम मार्गी लावण्यात दिलेल्या योगदानाबद्दल वाफोली आईरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांचा सत्कार करण्यात आला.पिंपळेश्वर युवक मंडळाने आयोजित केलेल्या ‘बाळू मामा’ या नाट्यप्रयोगाच्या…

Read Full News

हळवल श्री शिवराई रवळनाथ मंदिराचा उद्या ५ मे रोजी वर्धापन दिन…

⚡कणकवली ता.०४-: तालुक्यातील हळवळ येथील ग्रामदेवता श्री शिवराई रवळनाथ मंदिराचा ११ वा वर्धापन दिन मंगळवार, ५ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त भाविकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५.३० वाजता काकड आरतीने होणार असून सकाळी ७ वाजता देवाची पूजा व अभिषेक, सकाळी…

Read Full News

भुमिअभिलेख कार्यालयात खातेदाराला मागणी करूनही नकाशा नाही ; मात्र एजंटांना पैसे घेवून तात्काळ नकाशा…

या कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळलेला ; उपसभापती अमोल लोके यांचा पं.स.सभेत गंभीर आरोप,देवगड पं.स.मासिक सर्वसाधारण सभा संपन्न.. ⚡देवगड ता.०४-:देवगड भुमिअभिलेख कार्यालयात खातेदारांनी मागणी करूनही जमीनीचा नकाशा मिळत नाही मात्र एजंटानी मागणी केल्यानंतर तात्काळ नकाशा कार्यालयातून दिला जातो.या कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे असा गंभीर आरोप पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांनी देवगड पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत…

Read Full News

समाजसेवक रवी जाधव यांना ‘समाज उद्धारक पुरस्कार २०२६’ प्रदान…

⚡सावंतवाडी ता.०४- : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसेवक रवी जाधव यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘समाज उद्धारक पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. फुले शाहू आंबेडकर विचारमंचतर्फे आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला.रवी जाधव हे सावंतवाडी शहरासह परिसरातील गावांमध्ये आपत्तीच्या काळात मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. कॉलेज जीवनापासून त्यांनी उपेक्षित व वंचित…

Read Full News

जिल्हा बँक मठ शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन…

⚡वेंगुर्ला ता.०४-: आर्थिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा लहान असला तरी या वर्षी बँकेने ७००० कोटींचा व्यवसाया चा टप्पा पूर्ण केला व बँकेच्या ठेवींमध्ये सुध्दा वाढ झाली एवढा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष व संचालक मंडळावर ग्राहकांनी, जिल्हावासियांनी दाखवला हे काम कौतुकास्पद असेच आहे.राणेसाहेबांनी नेतृत्व हेरून अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा हिरा जिल्हा बँकेला मनीष दळवी यांच्या स्वरूपात बँकेला अध्यक्ष म्हणून दिला…

Read Full News

दोडामार्ग तालुक्यात बुद्ध जयंती उत्साहात…

दोडामार्ग, : विश्वशांती दूत गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, दोडामार्ग यांच्या वतीने बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील बौद्ध बांधव व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.दोडामार्ग येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेल येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीधर बाबुराव जाधव…

Read Full News

सावंतवाडीतील देवदूतांची धाव ; गोवा आणि ओरोसमध्ये रक्तदान करून वाचवले रुग्णांचे प्राण…

⚡सावंतवाडी ता.०४-: रक्तदानासारखे श्रेष्ठ दान दुसरे नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि रक्तदात्यांनी आणून दिला आहे. गोवा-बांबोळी, ओरोस-सिंधुदुर्गनगरी आणि पर्वरी येथील रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या तीन गरजू रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासल्यानंतर, सावंतवाडीतील तरुणांनी धाव घेत रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडवले. गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेले रुग्ण अविनाश चोरगे यांना बी पॉझिटिव्ह…

Read Full News

सबनीसवाडा परिसरात अर्धवट तोडलेल्या झाडांमुळे जीवितहानीचा धोका…

तात्काळ कारवाई करा: नगरसेविका मोहिनी मडगावकर यांची मागणी.. सावंतवाडी, ता. ०४ :शहरातील रस्त्यालगत अर्धवट तोडून ठेवलेल्या झाडांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत नगरसेविका तथा उद्यान व पर्यटन समिती सभापती सौ. मोहिनी मडगावकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राजवाड्याच्या…

Read Full News

पश्चिम बंगाल विजयाचा सावंतवाडीत भाजपकडून जल्लोष…

⚡सावंतवाडी, ता.०४-:पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने दिलेल्या कौलाबद्दल पश्चिम बंगालमधील जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले, अशी प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून…

Read Full News

You cannot copy content of this page