Headlines

स्व. विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनी काँग्रेसकडून अभिवादन…

⚡सावंतवाडी, ता. १५-: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सावंतवाडी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस कार्यालयात त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विकासभाई यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करून त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाला उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर यांच्यासह रविंद्र महापसेकर, आनंद परळकर, ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण तळवडेकर, देवानंद लुडबे, संजय लाड, संदीप सुखी, सुधीर मल्हार, कौस्तुभ पेडणेकर, अरुण भिसे, ॲड. समीर वंजारी, राजू सावंत, प्रदीप चौगुले, सगुण गावकर, संतोष तावडे, राजू मसुरकर, ओटवणेकर, अमिदी मेस्त्री तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी स्व. विकासभाई सावंत यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत, त्यांनी जपलेले विचार आणि समाजहिताची भूमिका पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना व्यक्त केल्या.

You cannot copy content of this page