Headlines

जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नवाढीसाठी शेती प्रक्रिया उद्योगांवर भर द्या…

खा. नारायण राणे: खा.राणे यांनी दिलल जिल्हा परिषदेला भेट.. ⚡ओरोस ता ११-: जिल्ह्यात उद्योग नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शेती, बागायती हाच पर्याय आहे. यातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्याला जास्त उत्पादन मिळून दरडोई उत्पन्नात भर पडणार आहे. याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकारी यांना आवाहन केले आहे. कृषी…

Read Full News

गाळाने भरलेल्या बंधारे-तलावांमुळे पूराचा धोका…

गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची मागणी करावी: सभेमध्ये घेतला ठराव.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता ११-:सिंधुदुर्गातील बंधारे व तलाव गाळाने भरले आहेत. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून सर्व तलाव व बंधारे गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची मागणी करावी. असा ठराव. आजच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत करण्यात आला. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची…

Read Full News

मालवण शहरातील गटार बांधणीची कामे नित्कृष्ट दर्जाची; सर्व कामांची तपासणी व्हावी…

नगरपालिका सभेत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांचा आरोप.. ⚡मालवण ता.११-:मालवण शहरातील मेढा येथील हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर पर्यंत गटार बांधणीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी मालवण नगरपालिकेच्या विशेष बैठकीत केला. या कामासह शहरातील इतर गटार बांधणीच्या…

Read Full News

मालवणात बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांचा स्पॉट पंचनामा सुरूच..

नाहीतर प्रशासनाच्या विरोधात स्वतः उपोषणाला बसण्याचा दिला इशारा.. ⚡मालवण ता.११-:मालवण शहरात आम.निलेश राणे, खास. नारायण राणे आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी येत असताना आलेल्या विकास कामांचा योग्यरीतीने वापर व्हावा या उद्देशाने मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी शहरात सुरु असलेल्या कामांवर करडी नजर ठेवली असून आज मालवण…

Read Full News

चौकुळ येथे आयोजित आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡आंबोली,ता. ११-: चौकुळ येथे रविवारी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात २६५ जणांनी लाभ घेतला. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ,गोवा आणि श्रीराम युवा कला क्रीडा मंडळ आंबोली तसेच फ्रेंडस सर्कल युवा मंडळ चौकुळ यांनी चौकुळ हायस्कूल येथे आरोग्य शिबिराचे रविवारी आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन पंचायत समिती सदस्य मायकल डीसोझा व शिवसेना (शिंदे गट)तालुका प्रमुख दिनेश…

Read Full News

“सोमनाथ स्वाभिमान पर्व” उत्साहात साजरे…

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे थेट प्रक्षेपणासह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.११-:भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “सोमनाथ स्वाभिमान पर्व : १००० वर्षे अखंड आस्था” या राष्ट्रीय उत्सवांतर्गत देवगड तालुक्यातील ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरात रविवारी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडले….

Read Full News

जिल्ह्यातील बारा कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे परवाने रद्द तर पाच परवाने निलंबित…

⚡सिंधुदुर्गनगरी,दि११-: खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या खतांचा व कृषी निविष्ठांचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात निविष्ठा विक्री केंद्रांच्या तपासणी मोहिमेमध्ये एकूण १९ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्या. अनियमितता आढळलेल्या १९ कृषी निविष्ठा विक्री केंद्रधारकांची परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या समक्ष झालेल्या सुनावणी दरम्यान ८…

Read Full News

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश…

⚡सिंधुदुर्ग दि.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी मंत्रालयात तातडीची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील वीज व पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबरोबरच नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. एल-निनोमुळे भविष्यात हवामानातील बदलांची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी ठेवावी, असेही…

Read Full News

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा…

– जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.११-:जिल्ह्यात गर्भलिंग निदानास प्रतिबंध घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करून नोंदींची काटेकोर पडताळणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. भ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या जन्मदरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती मोहिम राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट…

Read Full News

पाटील कॉम्प्लेक्स परिसरात विजेच्या वाढीव दाबाने उपकरणे जळाली…

महावितरणच्या कारभारावर साळगावकरांचा संताप: त्वरित दखल घ्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील.. ⚡सावंतवाडी ता.११-: शहरातील पाटील कॉम्प्लेक्स डीपी परिसरात आज अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे महावितरणच्या गलथान कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. सोमवारी दुरुस्तीच्या नावाखाली शहरात दिवसभर वीजपुरवठा…

Read Full News

You cannot copy content of this page