Headlines

मनसेच्या पाठपुराव्याला यश; बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती…

⚡बांदा ता.११-:बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध त्रुटी आणि कर्मचारी कमतरतेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. गेल्या महिन्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत बांदा आरोग्य केंद्रातील अडचणी आणि कर्मचारी कमतरतेबाबत सविस्तर निवेदन दिले होते.या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी आवश्यक त्या उपाययोजना…

Read Full News

ग्रामीण शिक्षण टिकविण्यासाठी समाजाने पुढे यावे…

वैभव नाईक:कळसुली इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.११-: ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हि शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून त्या समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत. १९६६ साली स्थापन झालेल्या कळसुली शिक्षण संस्थेने गेल्या अनेक दशकांत हजारो गुणवंत विद्यार्थी घडवून समाजाला दिशा दिली आहे. मात्र आज…

Read Full News

परांजपे कुटुंबाच्या समस्येची अखेर दखल..

सभापती मोहिनी मडगावकर घटनास्थळी, पर्यायी रस्त्याचे आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.११-: सहा महिने प्रशासनाकडे विनवणी करूनही दखल घेतली न गेल्याने येथील परांजपे कुटुंबाने आपली कैफियत मांडली. यानंतर आज स्थानिक नगरसेविका तथा सभापती मोहिनी मडगावकर यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जात पाहाणी केली. ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यासह पर्यायी रस्ता देखील न.प.कडून उपलब्ध करून देण्यासाठी बैठकीत भूमिका मांडणार असल्याची माहिती…

Read Full News

कचरा डेपोला भीषण आग; न.प. प्रशासनाच्या तत्परतेने आग आटोक्यात…

⚡सावंतवाडी ता.११-: शहराच्या सीमेवर असणाऱ्या न.प.च्या कचरा डेपोला आज दुपारच्या वेळी आग लागली. यामुळे परिसरात धुराचे लोट वाहू लागले होते. न.प. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. येथील कचरा डेपोत सुका कचरा ठेवला जातो. आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट वाहू लागले. आगीन उग्र रूप धारण केल्यानंतर न.प.चे अधिकारी,…

Read Full News

माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘माणिक मोती’ संगीत मैफिल १६ मे रोजी…

⚡सावंतवाडी ता.११-: विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता निमित्ताने ”माणिक मोती” या विशेष संगीत मैफिलीच आयोजन स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. शनिवार १६ मे २०२६ रोजी सायं. ५.३० वा. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे…

Read Full News

भोसले सैनिक स्कूलचे निवासी स्काऊट-गाईड शिबिर शिरवल येथे उत्साहात संपन्न…

निसर्गाच्या शाळेत संस्कार, स्वावलंबन व जीवन शिक्षणाचा अविस्मरणीय अनुभव.. ⚡सावंतवाडी ता.११-: केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर अनुभवातून मिळणारे शिक्षणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा देते या विचाराला मूर्त रूप देत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे तीन दिवसीय निवासी स्काऊट-गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ४ ते ६ मे या कालावधीत शिरवल, ता.दोडामार्ग येथील निसर्गरम्य परिसरात…

Read Full News

भाजप खा विनोद तावडे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

प्रभाकर सावंत यांची माहिती:जिल्हा भाजपाच्यावतीने स्वागत आणि सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन. ⚡ओरोस ता ११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, नवनियुक्त राज्यसभा खा विनोद तावडे१२ मे २०२६ रोजी जिल्ह्यात येत असून त्यांचा जिल्हा भाजपाच्यावतीने स्वागत आणि सत्कार सोहळा १२ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता प्रहार भवन,कणकवली येथे खा नारायण राणे यांच्या हस्ते, पालकमंत्री नितेश…

Read Full News

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.११-: येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल व LSM फुटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ या प्रशालेमध्ये दि. 2 मे ते 10 मे या कालावधीत संपन्न झालेल्या समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या समर कॅम्पचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, कुडाळ पोलीस उपनिरीक्षक जनार्दन झारापकर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. चैताली…

Read Full News

कुडाळमध्ये जिल्हास्तरीय देवळी समाज मेळावा उत्साहात संपन्न…

⚡कुडाळ ता.११-: देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात करण्यात आले. यावेळी बोलताना राजन नाईक म्हणाले, देवळी जिल्हाभर…

Read Full News

सबनीसवाडा राजवाडा परिसरातील धोकादायक फांद्या हटविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष…

निशांत तोरसकर:निवेदन देऊनही कारवाई नाही, नगरसेविका मोहिनी मडगावकर यांची प्रशासनावर अंकुश नसल्याची केली टीका.. ⚡सावंतवाडी ता.११-: सबनीसवाडा राजवाडा परिसरातील रस्त्यावर अर्धवट तुटलेल्या अवस्थेत झाडाच्या धोकादायक फांद्या गेले पंधरा दिवस लोंबत असूनही सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना उबाठा शहर संघटक निशांत तोरसकर यांनी केला आहे. या प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर…

Read Full News

You cannot copy content of this page