Headlines

आशिये दत्तमंदिरात स्वर तालाची नित्यनूतन अनुभूती

स्वप्नील भिसे यांचे एकल तबलावादन;प्रियांका भिसे यांची संवादिनी साथ ⚡कणकवली ता.०१-: आशिये येथील दत्तमंदिरात गंधर्व फाउंडेशनतर्फे संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. सलग 38 महिने सुरू असलेल्या मासिक संगीत सभेला कोविड काळात पडलेल्या ३२ महिन्यांच्या खंडानंतर ही मैफल आयोजित करण्यात आली होती.पहिल्या सत्रात पं. योगेश सम्सी यांचे शिष्य स्वप्नील भिसे यांचे एकल तबलावादन सादर झाले. युवा…

Read More

सर्वधर्म समभावाने राहण्याची प्रेरणा रुजणे काळाची गरज : मंगल परब

⚡कणकवली ता.०१-: खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशातून सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ही एक…

Read More

काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये यांची निवड

⚡कणकवली ता.०१-: राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये यांची निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय काँग्रेस कणकवली कार्यालय येथे करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रविण वरुणकर, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, राजु वर्णे, प्रदीपकुमार जाधव, निलेश मालंडकर, नादीरशा पटेल, संतोष तेली, अमृता मालंडकर, रुपा चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी भारताच्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांची…

Read More

जिल्ह्यात पहिला पक्षी निरीक्षण कार्यक्रम तळकट वन उद्यानात संपन्न

२० हून अधिक निसर्ग प्रेमी, छायाचित्रकार झाले होते सहभागी ⚡बांदा ता.०१-: मृगया एक्सपीडिशन आणि सिंधुदुर्ग वाइल्ड टुर्सच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहीलाच जंगल बर्डवॉक (पक्षी निरीक्षण) आज तळकट (ता. दोडामार्ग) वन उद्यानात घेण्यात आला. यावेळी हौशी निसर्ग प्रेमी, छायाचित्रकर, पक्षी निरीक्षक यांनी सहभागी होत २० हुन अधिक पक्षांच्या प्रजाती अभ्यासल्या.या बर्ड वॉक मध्ये घनदाट जंगलात…

Read More

गंगाराम शेळके यांचे अपील उपनिबंधक यांनी फेटाळले

सावंतवाडी खरेदी विक्री संघ निवडणूक ⚡सावंतवाडी ता.०१-: छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज बाद केल्याच्या विरोधात जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक यांच्याकडे उमेदवार गंगाराम शेळके यांनी केलेले अपील फेटाळत सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. या कामी वकील म्हणून परिमल नाईक यांनी काम पाहिले. सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गंगाराम…

Read More

सिंधुदुर्गात लवकरच दशावतार नाट्य महोत्सव

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने होणार आयोजन;कोकण विभाग सहसंयोजक शरद पेंडसे यांची वेंगुर्ले भाजपा कार्यालयाला भेट ⚡वेंगुर्ला ता.०१-: भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे कोकण विभाग सहसंयोजक शशिकांत शरद पेंडसे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. सिधुदुर्गात लवकरच भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read More

संगिता कुबल यांना दि प्राईड ऑफ महाराष्ट्र एमजेएफ अवॉर्ड‘ ने सन्मानीत

⚡वेंगुर्ला ता.०१-: नवी मुंबई येथील महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या संस्थेतर्फे वेंगुर्ला नगरपरिषदेच्याा प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना ‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र ः एमजेएफ अवॉर्ड‘ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा ३० ऑक्टोबर रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह वाशी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या…

Read More

जीवन स्रोत सेवा संस्थेच्यावतीने हृदय तपासणी शिबीर

⚡कणकवली ता.०१-: जीवन स्त्रोत सेवा संस्थेच्यावतीने हृदयाची मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात २५ महिलांची तपासणी करण्यात आली. वाढता ताण तणाव व धकाधकीचे जीवन यामुळे आपल्या दिनचर्येत बराच फरक पडत आहे, यात सर्वात जास्त महिला वर्ग आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत आहे या बाबी लक्षात घेता जीवनस्त्रोत सेवा संस्थेच्यावतीने संस्थेच्या अध्यक्षा शीतल मांजरेकर…

Read More

कणकवलीतील सा. बां. उपअभियंता गणेश कर्वे यांचे निधन

⚡कणकवली ता.०१-: सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणेश ज्ञानेश्वर कर्वे (४५) यांचे सोमवारी रात्री निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या काम करण्याच्या सकारात्मक पद्धतीमुळे वर्षभरातच तालुक्यात अनेकांशी स्नेहाचे संबंध निर्माण केले होते.गेले काही महिने गणेश कर्वे यांना पोट विकाराचा त्रास होता व त्यावर उपचारही सुरू होते. सोमवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने…

Read More

झाराप-पत्रादेवी मार्गांवर मळगाव येथे चारचाकी गाडी पलटी

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडली घटना ⚡सावंतवाडी ता ०१-: झाराप-पत्रादेवी मार्गांवर मळगाव ब्रिज जवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने चारचाकी गाडी जवळील शेतात पलटी झाली. ही घटना आज सकाळी घडली आहे. यात गाडीचे नुकसान झाले असून कोणाला दुखापत झाली आहे हे मात्र समजू शकले नाही

Read More
You cannot copy content of this page