तीन ग्रामपंचायत सदस्यांचा शिंदे सेनेत प्रवेश
⚡मालवण ता.०५-: तळगाव ग्रामपंचायतींच्या विद्यमान सदस्या सौ. विनीता तुळसकर, अच्युत लोके आणि आकाश तुळसकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. खासदार विनायक राऊत यांचे गाव असणाऱ्या तळगावातील विद्यमान सदस्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने खास. राऊत यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी व्यक्त केली आहे.
या प्रवेश प्रसंगी तालुकाप्रमुख राजा गावकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे, पराग खोत, बाळु नाटेकर, महिला उपजिल्हा संघटक निलम शिंदे, महिला उपतालुका संघटक भारती घारकर आदी उपस्थित होते.
