सरपंच पदाचा एकही अर्ज अवैध नाही
⚡सावंतवाडी ता.०५-: तालुक्यातील 52 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असून आज उमेदवारी अर्ज छाननी मध्ये एकही सरपंच पदाचा अर्ज अवैध ठरला नाही तर तीन ग्रामपंचायत सदस्य उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे आता वैद नामनिर्देशन अर्जांची संख्या सरपंच पदाची 186 तर सदस्य पदाची 914 इतकी झाली आहे तर आज अर्ज छाननी मध्ये तालुक्यात बिनविरोध ग्रामपंचायत सरपंच एकूण संख्या पाच झाली आहेत यामध्ये नेतर्डे तांबोळी आजगाव सातोसे आणि गेळे या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे केवळ एक अर्ज दाखल झाल्यामुळे हे सरपंच बिनविरोध झाले आहेत सात डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्यानंतर लढत निश्चित होणार आहे किंवा रिंगणात असलेल्या 47 सरपंच पदांपैकी आणखी किती सरपंच अथवा ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध होतील हेही त्याच वेळेस स्पष्ट होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे अर्ज भरणे, छाननी करणे यासाठी जिमखाना मैदानावरील बाळासाहेेब प्रबोधिनी केंद्रात ही प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान एकाच वेळी अनेक ग्रामपंचायतीचे उमेदवार त्या ठिकाणी बोलविले जात असल्यामुळे त्या केंद्रात आज गर्दी निर्माण झाली. मात्र इमारतीत सुसज्ज व्हेंटिलेशन नसल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले उमेदवार आणि अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी नाराज झाले. याबाबतची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
