⚡वेंगुर्ले ता.०५-: वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक छाननी प्रक्रियेत केवळ २ ग्रामपंचायतचे ३ सदस्य अर्ज अवैध ठरले आहेत.यामध्ये भोगवे ग्रामपंचायत साठी दाखल झालेल्या २२ सदस्य अर्जापैकी २ सदस्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
तर मेढा ग्रामपंचायत सदस्य साठी दाखल झालेल्या ११ अर्जापैकी १ सदस्य अर्ज अवैध ठरला आहे.एकूण २३ ग्रामपंचायत साठी दाखल १०४ अर्ज वैध ठरले आहेत.तर ४८४ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ४८१ अर्ज वैध ठरले आहेत.
