वेंगुर्ला
वेंगुर्ला शिरोडा या मुख्य मार्गावरील सागरतीर्थ कार्यक्षेत्रातील मानस आरवली टाक मुख्य रस्त्यावरील धोकादायक स्थितीबाबत आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.
येथील डागडूजीचे काम चार दिवसात करण्याचे आश्वासन वेंगुर्ला सार्वजनिक बांधकाम उपअभियंता विजय चव्हाण यांनी दिले. पंचायत समिती सदस्य संकेत धुरी यांनी वेंगुर्ला तालुक्यातील हा मुख्य मार्ग असल्याने आरवली टाक सागरतीर्थ मानस कार्यक्षेत्रात बऱ्याच ठिकाणी मुख्य रस्त्यावर व साईडपट्टीवर धोकादायक स्थिती असल्याने सा.बां. विभाग अधिकारी यांची भेट घेऊन वाहनधारकांच्या हिताच्या दृष्टीने डागडुजीचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी केली होती. तसेच पंचायत समिती मासिक सभेत याबाबत प्रश्न मांडला होता. दरम्यान उपअभियंता विजय चव्हाण यांनी सागरतीर्थ कार्यक्षेत्रात संबंधित धोकादायक मुख्य रस्त्यावरील पाहणी करून डागडुजीचे काम चार दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील मुख्य मार्ग असल्याने वाहनधारकांच्या जीविताच्या हिताच्या दृष्टीने संकेत धुरी यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने अधिकाऱ्यांनी तातडीने व्हिजिट केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी यांच्या मागणीची सा. बां. कडुन त्वरित दखल….
