Headlines

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-:केंद्र शासनाच्या सन 2020-21 या वर्षाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारचे वितरण करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती https://awards.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.*

Read More

देवगड फिशरमेन्स सोसा.चेअरमन पदी द्विजकांत कोयंडे, व्हॉइस चेअरमन उमेश आंबेरकर यांची बिनविरोध निवड

⚡देवगड ता.०२-:देवगड फिशरमेन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड देवगड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ते २०२७ या कालावधीसाठी घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यासी अधिकारी पी. एल. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी २ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी द्विजकांत विठ्ठल कोयंडे व व्हॉइस चेअरमन पदी उमेश पांडुरंग आंबेरकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली…

Read More

जिल्ह्यात 17 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी ता.०२-: जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी 1.00 वाजल्यापासून ते दिनांक 17 नोंव्हेंबर 2022 रोजी रात्रौ 24.00 वाजेपर्यंत जिल्ह्याच्या…

Read More

७ रोजी परुळे येथे भव्य चपई स्पर्धा

वैभववाडी संजय शेळकेश्री अंबाबाई सिद्धाई चपई ग्रुप व मित्र मंडळ परुळे वेंगुर्ला आयोजित जिल्हास्तरीय भव्य चपई स्पर्धेचे आयोजन सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी वराठी मंगल कार्यालय परुळे बाजार वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेले आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10000 हजार व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 7000 व आकर्षक चषक, तृतीय…

Read More

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छ्ता मोहीम

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उपक्रम मालवण दि प्रतिनिधीहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुक्याच्या वतीने माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथे साफसफाई मोहीम सुरु करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात महाराजांसमोर नतमस्तक होऊन या स्वच्छता…

Read More

ओसरगाव विठ्ठल रखुमाई मंदिरात ४ नोव्हेंबरपासून हरीनाम सप्ताह व जत्रोत्सव

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील ओसरगाव कानसळीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शुक्रवार ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव होणार आहे.४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. विधिवत पूजा, ९ वा. घटस्थापना, १० वा. पासून स्थानिक भजने, सायं. ७ वा. पासून दिंड्या, भजने, चित्ररथ आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तर…

Read More

वेदांताचा दगडी कोळसा परस्पर विक्रीस नेणाऱ्या दोघा ट्रकचालकांना जामीन

⚡कणकवली ता.०२-: वेदांता कंपनीचे दोडामार्गहून झारखंडला २२ टन वजनाचे ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दगडी कोळशाने भरलेले दोन ट्रक झाराप रेल्वे यार्डात न नेता चोरून परस्पर कोल्हापूर येथे अवैध विक्रीकरीता नेले जात असताना करुळ चेकपोस्ट येथे पकडण्यात आले होते. याप्रकरणी अटकेत असलेल्या ट्रक चालक ज्योतीबा गावडे (रा. बेळगांव) व नियाज युसूफ मुजावर (रा. शेर्ले,…

Read More

मालवणात ६ रोजी रक्तदान शिबीर

⚡मालवण ता.०२-: एकता मित्रमंडळ व दैवज्ञ हितवर्धक समाज, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत बाजारपेठ कासारव्हाळी देसाई बिल्डिंग, भरड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, अधिक माहितीसाठी अमेय देसाई (९४०४५३५२७३), हितेंद्र हिर्लोस्कर यांच्याशी. संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Read More

मालवण जेटीचे उदघाटन व बंदर विकासासाठी निधी देण्याची मागणी

⚡मालवण ता.०२-: राज्याचे बंदर विकास मंत्री दादाजी भुसे यांची आज आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत बंदर विभागातर्फे उभारण्यात आलेल्या मालवण जेटीचे अधिकृत उदघाटन करण्याची मागणी केली. त्याचबरोबर मालवण तालुक्यातील देवबाग संगम येथील साचलेल्या गाळाचा उपसा करण्यासाठी व देवबाग संगम येथे जेट्टी व त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्याची मागणी…

Read More

माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आकाश कंदील आणि दिवाळी भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद….

मालवण दि प्रतिनिधीबॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पहिली ते चौथी , पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला गट अशा चार गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील आकाश कंदील स्पर्धेत १०५ व…

Read More
You cannot copy content of this page