वीज वितरण कंपनीने तात्काळ बदलावा;सामाजिक बांधिलकी संघटनेची मागणी
⚡सावंतवाडी ता.०७-: संचयनी बिल्डिंग समोरील रस्त्यावरील विद्युत वाहिनी पोल पूर्णपणे जीर्ण झाला असून, तो कधीही कोसळून मोठा अपघात होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असून, विद्युत विभागाने तो पोल तातडीने बदलावा अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
