महाराष्ट्र एकीकरण समिती जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी केला निषेध
⚡सावंतवाडी ता.०६-: बेळगाव येथील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आणि सद्यस्थितीमध्ये सुरू झालेल्या तोडफोडीचा महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला बाळासाहेबांची शिवसेना पक्ष म्हणून घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्न तोंड उघडावे बाळासाहेबांनी केलेले आंदोलन आठवावे असा सल्ला देत भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाचा मुद्दा बाजूला सारण्यासाठी सीमा भागामध्ये हे षडयंत्र करत असल्याचाही आरोप अण्णा केसरकर यांनी केला.ते सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले आज सकाळपासून कन्नड वेदिका संघटनेतर्फे महाराष्ट्रातील ट्रक वर हल्ले करून तोडफोड करून ट्रकला काळे फासण्याचा प्रकार केला हा प्रकार निंदनीय असून असे प्रकार कर्नाटक मध्ये होत असतील तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रातून एकही कर्नाटक पासिंगची गाडी येऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला
मराठी भाषिकांवर अन्याय करण्याचे मारहाण करण्याची गाड्या फोडण्याचे काम केंद्रातील भाजप आणि कर्नाटक भाजप सरकारकडून होत आहे याला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला
त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कर्नाटक भाषा सक्तीविरोधात कर्नाटकात जाऊन मोर्चा काढला होता आंदोलन केले होते त्यानंतर कर्नाटक भाषा सक्ती मागे घेण्यास भाग पाडले होते त्यावेळी कोणाची हिंमत नव्हती आता बाळासाहेबांचे शिवसेनेचे नाव सांगणारयांनी ही हिंमत दाखवावी असे आव्हान केसरकर यांनी दिले आज भाजपा सरकार कर्नाटकात मराठी भाषिकांवर हल्ले करत आहे शिवछत्रपतींची बदनामी करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचाही घणाघाती आरोप अण्णा केसरकर यांनी केला आता पुन्हा एकदा बजाव पुंगी हटाव लुंगी ची मोहीम राबवावी लागणार आहे कन्नड भाषिक आमच्या इथे आहेत आमचे मराठी बांधवही त्यांच्या बेंगलोर बेळगाव मध्ये आहे दोघेही गुणा गोविंदाने नांदत आहेत असे असताना प्रांतवाद आणि भाषावाद करून कर्नाटक सरकारची जर राष्ट्रीय एकोपा बिघडू पाहत असेल तर त्याला वेळीच पाबंद घालणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले
