वेताळ प्रतिष्ठानच्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
⚡वेंगुर्ला ता.२७-: वेताळ प्रतिष्ठानतर्फे तुळस येथे सलग नवव्या वर्षी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत सिया गावडे, सिद्धी गावडे व जयराम राऊळ तर रंगभरण स्पर्धेत राही मोबारकर व सानवी सातार्डेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. दोन्ही स्पर्धांमध्ये सुमारे ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
