⚡मालवण ता.२६-: मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त मंदिर आणि साधना संगीत यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय संगीताची बैठक संपन्न झाली. त्यास संगीत प्रेमींचा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. दिलीप ठाकुर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पून झाली. संजय गावडे, महेंद्र मराठे, प्रफुल्ल रेवंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. साधना संगीत विद्यालयाच्या संचालिका रविना पांजरी यांनी स्वागत केले.
कार्यक्रमात कारवार सदाशिवगडचे ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचे गायक चिन्मय कर्वे यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. त्यांनी सुरुवातीला रागेश्री रागातून छोटा ख्याल व लसवंती रागातून बडा ख्याल मांडला. नंतर नाट्यगीत आणि अभंग सादर केले. त्यांना संवादिनीवर प्रतीक कोतिवडेकर, तबल्यावर किशोर सावंत, पखवाज प्रभूदास आजगावकर आणि तालरक्षक म्हणून कुणाल वराडकर यांची संगीत साथ लाभली. बलवंत चिंचाळकर, हेमंत आचरेकर, बाळा आचरेकर, सुधीर गोसावी, स्वागत नीलेश गवंडी, महेश धामापूरकर, बाळू काजरेकर आणि श्री दत्त मंदिर देवस्थानचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रभूदास आजगावकर यांनी केले.
