ओरोस ता २६
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल ग्रामपंचायत शौचालय निधीत अपहार झाल्याच्या तक्रार झाली होती. याबाबत सावंतवाडी गटविकास अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने अहवाल मागितला होता. त्या अहवालात पात्र लाभार्थीनाच शौचालयाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींचे अनुदान शिल्लक असल्याचा अहवाल दिला आहे. तसे पत्र जिल्हा प्रशासनाने सकाळ पासून उपोषणास बसलेल्या विशाल राहुल यांना दिले आहे. त्यामुळे विशाल राहुल यांनी आपले उपोषण थांबवले आहे. त्यांना स्वच्छता अभियानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांना सरबत पाजले.
माडखोल येथील विशाल, राहुल यांचे उपोषण मागे
