वेताळ प्रतिष्ठानच्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेताळ प्रतिष्ठानतर्फे तुळस येथे सलग नवव्या वर्षी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत सिया गावडे, सिद्धी गावडे व जयराम राऊळ तर रंगभरण स्पर्धेत राही मोबारकर व सानवी सातार्डेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. दोन्ही स्पर्धांमध्ये सुमारे ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

  स्पर्धेचे उद्धाटन सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी जैतिराश्रित संस्थेचे अध्यक्ष अॅड.प्रभानंद सावंत, कार्यवाह कृष्णा तावडे, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, प्रकाश परब, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष प्रदिप परुळकर, निवृत्त पोलिस सुधीर चुडजी, अॅड.मनिष सातार्डेकर, घोडे-पाटील सर, विस्तार अधिकारी जयेश राऊळ, मंगेश सावंत आदी उपस्थित होते. स्पर्धेचा संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे- 

  रंगभरण स्पर्धा-बालवाडी-प्रथम-राही मोबारकर (देसाई स्कूल,वेंगुर्ला), द्वितीय-आरोही कुंभार (शारदा विद्यालय,तुळस), तृतीय-देवांश परब (मातोंड नं.१), उत्तेजनार्थ-रुद्र नेमळेकर (शारदा विद्यालय,तुळस) व अन्वय सापळे (ब्लुमिग बडर्स, वेंगुर्ला), पहिली-दुसरी गट - प्रथम-सानवी सातार्डेकर (देसाई स्कूल, वेंगुर्ला), द्वितीय-रुजुल सातोसे (पडतेवाडी शाळा कुडाळ), तृतीय-शशिकांत नाईक (स्वामी विद्यालय-तुळस), उत्तेजनार्थ-चंद्रकांत जुवेकर (वजराठ नं.१) व भूमी परुळकर (वेताळ विद्यालय तुळस)

  चित्रकला स्पर्धा-तिसरी ते चौथी गट-प्रथम-सीया गावडे (सिधुदुर्ग विद्यानिकेतन, वेंगुर्ला), द्वितीय-कौस्तुभ परब (वेंगुर्ला नं.२), तृतीय-श्रीकृष्ण मोचेमाडकर (सेंट फ्रान्सिस-आजगांव), उत्तेजनार्थ-लोहित्य पवार (स्वामी विद्यालय-तुळस), साईराज शेटकर (मातोंड-गावठण शाळा), पाचवी ते सातवी - प्रथम-सिद्धी गावडे (सिधुदुर्ग विद्यानिकेतन वेंगुर्ला), द्वितीय-सर्वेश मेस्त्री (वेंगुर्ला नं.३), तृतीय-प्रिया देसाई (मिलाग्रीस हायस्कूल-सावंतवाडी), उत्तेजनार्थ-प्रज्वल परुळकर (जैतिर विद्यालय-तुळस), राशी सातोसे (इंग्लिश मिडियम स्कूल कुडाळ),  आठवी ते दहावी - प्रथम-जयराम राऊळ (कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी), द्वितीय-विष्णू आरोलकर (दाभोली हायस्कूल), तृतीय- दीक्षा पालकर (अणसूर-पाल हायस्कूल), उत्तेजनार्थ-हर्ष पास्ते (वेंगुर्ला हायस्कूल) व प्रथमेश भोकरे (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा)

  स्पर्धेचे परिक्षण सुबक आर्टचे संचालक चित्रकार पंकज घोगळे, चित्रकार गणेश कुंभार यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना ८ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन गावडे, महेश राऊळ, सचिन परुळकर, सागर सावंत, सद्गुरू सावंत, निखिल ढोले, केशव सावंत, यशवंत राऊळ, प्रतिक परुळकर, जान्हवी सावंत, वैष्णवी परूळकर, सानिया वराडकर, मंगेश सावंत, प्रज्वल परुळकर, ओंकार राऊळ, निकिता कबरे आदींनी मेहनत घेतली.
You cannot copy content of this page