ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
⚡सावंतवाडी ता.२६-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला सावंतवाडी तालुक्यातील गेली अनेक वर्ष रखडलेला आजगाव ते तिरोडा, गुळदुवे, नाणोस, रेडी रस्त्याचे भूमिपूजन तिरोडा सरपंच माधवी पटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याच्या कामास सुरुवात होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी रस्त्याचे डांबरीकरण व सुधारणा करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. सदर रस्त्याचा कालावधी हा २४ महिन्याचा असून गावच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे माधवी पटेकर यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम आडारकर, दिनकर गोडकर, प्राची मयेकर, पोलीस पाटील लहू रगजी, माजी सरपंच मधुकर साटेलकर, ग्रामपंचायत कर्मचारी पपी मयेकर, कुंदा साटेलकर आदी उपस्थित होते
