Headlines

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ जामसंडे येथे बुधवारी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या बुधवार दि.28 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रम देवगड तालुक्यातील जामसंडे येथील श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तहसिलदार स्वाती देसाई यांनी दिली.

Read More

‘चला जाणुया नदीला’ अंतर्गत बुधवारपासून संवाद यात्रा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: जिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या अभियांनातर्गत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कडशी नदीच्या काठावर वसलेल्या मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये ‘कडशी नदी संवाद यात्रेचे’ आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गो. ह. श्रीमंगले यांनी दिली आहे. संवाद यात्रेची उद्दिष्टे नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे. जनसामांन्यांना…

Read More

‘चला जाणुया नदीला’ अभियानांतर्गत कडशी नदी संवाद यात्रा पुढे ढकलली

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: जिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या संवाद यात्रा सुरु करण्यापुर्वी संबंधित विभागाकडून कडशी नदी मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये आयोजित केलेली कडशी नदी संवाद यात्रा अतंर्गत चर्चासत्र व बैठकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून या बैठका व चर्चासत्र जानेवारी 2023 च्या पहिल्या व दुसऱ्या सप्ताहात घेण्याचे नियोजन,असल्याची माहिती…

Read More

सरपंच पदाच्या काळात कांदळगावातील विकासात्मक कामे मार्गी लागल्याने पूर्ण समाधानी – उमदी परब

⚡मालवण ता.२७-: कांदळगाव मधील मागील पाच वर्षाचा विकास कामांचा आलेख हा मालवणातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात उल्लेखनीय झाला आहे. तसेच बऱ्याच कामांना मंजुरी मिळाली असून ती कामेही मार्गी लागणार असल्याने आपण समाधानी असल्याचे मत कांदळगावच्या माजी सरपंच उमदी परब यांनी व्यक्त केले आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात कांदळगाव मध्ये अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली….

Read More

“रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे कार्य कौतुकास्पद आहे”

रोटरी गव्हर्नर, व्यंकटेश देशपांडे ⚡वैभववाडी ता.२७-: रोटरी क्लब ऑफ वैभवाडीच्या वतीने वैभववाडी बस स्थानकाचे स्वच्छता व सुशोभीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर या कामाची पाहणी रोटरी गव्हर्नर श्री व्यंकटेश देशपांडे यांनी आज केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रोटरी क्लब वैभववाडी चे सर्व उपक्रम मी नेहमी पाहत असून नवीन क्लब असूनही त्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेले काम आणि…

Read More

दातृत्वाची भावना मनात ठेवा! श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. गावडेकाका महाराज यांचे आवाहन

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट वर्धापन दिन उत्साहात ⚡मालवण ता.२७-: आपल्या पूर्वजानी रितीरिवाज जपून पुण्य कमावल्यामुळे त्याचे फायदे आपण घेत आहोत. तुम्ही सुद्धा पुण्य कमवा. दातृत्व, प्रेम भावना ठेवा. जीवनशैली सुसंस्कृत आणि आनंदित होण्यासाठी दातृत्वाची भावना ठेवा. स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून अनेकांना वैधकीय मदत,अनेक संसार सावरण्यासाठी मदत केली जाते. एक एक रुपया लोक कल्याणासाठी…

Read More

सौ. अनुष्का कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

⚡मालवण ता.२७-: ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीचे जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालय बिळवसच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जिंदाल ग्रुपचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते पुष्कराज कोल्हे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. अनुष्का कदम या सातत्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवित असतात. इंग्रजी विषयाचे अध्यापन…

Read More

सेवानिवृत्त सेवक संघाची १ रोजी सभा

⚡मालवण ता २७-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कुल, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पेन्शनर डे निमित्त ज्येष्ठ पेन्शनरचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

Read More

दुर्गवीर प्रतिष्ठानची रामगडावर श्रमदान मोहीम

सातत्यपूर्ण श्रमदानातून किल्ला झाडीझुडपातून मोकळा करण्याचा दुर्गवीरांचा संकल्प ⚡मालवण ता.२७-: दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने दिनांक २४ आणि २५ डिसेंबर २०२२ रोजी किल्ले रामगड स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दीड दिवस चाललेल्या या मोहिमेत गडाच्या इतिहासकालीन मुख्य दरवाजा ( होळीचा दरवाजा) तसेच किल्ला परिसरात वाढलेली झाडीझुडपे, तटबंदीला घातक ठरणारे झाडे साफ करण्यात आली….

Read More

आचरा ग्रामपंचायततर्फे आचरा समुद्र किनारी स्वच्छता मोहिम विद्यार्थी शिक्षकांसह ग्रामस्थ सहभागी

⚡मालवण ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. यामुळे प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यामुळे स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आचरा ग्रामपंचायत तर्फे आचरा समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आचरे सरपंच प्रणय टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आचरा परिसरातील शाळांचे विद्यार्थी…

Read More
You cannot copy content of this page