सौ. अनुष्का कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

⚡मालवण ता.२७-: ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीचे जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालय बिळवसच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जिंदाल ग्रुपचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते पुष्कराज कोल्हे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

सौ. अनुष्का कदम या सातत्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवित असतात. इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना दरवर्षी राज्यस्तरावर नवोपक्रम सादर करतात. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील असतात. शैक्षणिक लेख, निबंध लेखन करीत असतात. सौ. कदम यांच्या या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. या यशाबद्दल बिळवस ग्रामसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव, सचिव अशोक पालव, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सौ. कदम यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page