रोटरी गव्हर्नर, व्यंकटेश देशपांडे
⚡वैभववाडी ता.२७-: रोटरी क्लब ऑफ वैभवाडीच्या वतीने वैभववाडी बस स्थानकाचे स्वच्छता व सुशोभीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर या कामाची पाहणी रोटरी गव्हर्नर श्री व्यंकटेश देशपांडे यांनी आज केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रोटरी क्लब वैभववाडी चे सर्व उपक्रम मी नेहमी पाहत असून नवीन क्लब असूनही त्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेले काम आणि करत असलेले कार्य हे इंटरनॅशनल रोटरी ला अभिप्रीत असलेलेच कार्य असून ते गौरवास्पद आहे. प्रेसिडेंट संतोष टक्के आणि त्यांच्या सहका-यानी रोटरी क्लब ची प्रतिमा उंचावण्यासाठी अतिशय चांगले सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याची दखल इंटरनॅशनल रोटरीने घेतली असल्याचे सांगितले.
रोटरी गव्हर्नर यांचा आगमन झाल्यानंतर वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईनकर यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं. त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या वतीने कंट्रोलर श्री.रावराणे यांनी गव्हर्नर देशपांडे यांना पुष्पगुच्छ देऊन एसटी बस स्थानकाचे सुशोभीकरणाचे काम केल्याबद्दल आभार मानले. रोटरी क्लब ने एसटी बस स्थानक सुशोभित करून सामान्य प्रवाशांसाठी समाधानकारक कार्य केले असल्याचे सांगितले.
यावेळी फस्ट लेडी सौ देशपांडे, प्रेसिडेंट संतोष टक्के, असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर , नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत,पोलीस निरीक्षक अमित यादव, नगरसेवक विवेक रावराणे,एसटी कंट्रोलर रावराणे, रोटरी क्लब सेक्रेटरी संजय रावराणे, सूर्यकांत धावले, सचिन रावराणे, मुकुंद रावराने, महेश संसारे, सुरेंद्र नारकर, मनोज सावंत, शरद नारकर , तेजस आंबेकर, सुनील कुंभार, सुनिल रावराणे, सौ. सलोनी टक्के, सौ नंदिनी रावरणे, श्रेया धावले, सौ संजना रावरणे, प्राध्यापक गवळी ,नितीन बांदेकर, मंदार चोरगे, आदी रोटेरियन व प्रवासी उपस्थित होते.
