⚡मालवण ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. यामुळे प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यामुळे स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आचरा ग्रामपंचायत तर्फे आचरा समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली
आचरे सरपंच प्रणय टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आचरा परिसरातील शाळांचे विद्यार्थी ग्रामविकास अधिकारी पी जी कदम विस्तार अधिकारी राजेंद्र कांबळे सीआरपी गायत्री वाडेकर यशराज प्रेरणा गृपचे मंदार सरजोशी, समीर आचरेकर, धनश्री आचरेकर ,संघ अध्यक्ष नंदिनी पांगे पोलीस पाटील जगन्नाथ जोशी तसेच केंद्र शाळा आचरे नंबर 1, शाळा पिरवाडी, उर्दू शाळा ,न्यू इंग्लिश स्कूल ,इंग्लिश मीडियम या शाळेचे विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
