Headlines

कासार्डे येथे आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शन निकाल जाहीर

⚡कणकवली ता.२६-: कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कासार्डे येथे आयोजित श्री.आर.व्ही. नारकर पुरस्कृत शालेय विज्ञान प्रदर्शनात तब्बल ३९ प्रतिकृतींचा सहभाग दर्शविला गेला असून, प्राथमिक गटातून कु.कुणाल राणे आणि दत्तराज केसरकर यांनी सादर केलेल्या ‘ग्रास कटर’ या प्रतिकृतीने तर माध्यमिक गटातून विघ्नेश पाताडे याने सादर केलेल्या ‘ग्रॅवेटी बेस्ड इलेक्ट्रिक जनरेटर’ या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.या…

Read More

कासार्डे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

⚡कणकवली ता.२६-: कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, शाळा समितीचे सदस्य तथा माजीसैनिक रविंद्र पाताडे, प्राचार्य मधुकर खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर, जेष्ठ शिक्षिका सौ.बी.बी.बिसुरे,सौ.आर.ए.कासार्डेकर व गणित विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका…

Read More

सालईवाडा गटाराचे काम बोगस

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी काम पाडले बंद ⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी शहरातील सालईवाडा भागात सुरु असलेल्या गटार योजनेचे काम हे बोगस पद्धतीने सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज येथे केला. दरम्यान सालईवाडा भागात सुरू असल्या गटाराचे काम संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याच किंवा ठेकेदाराचे लक्ष नसून बोगस वाळू देखील वापरली जात आहे. यामुळे…

Read More

एससी, एसटी प्रवर्गातील तरुणांनी नोकरी प्रदाता बनावे

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन;सिंधुदुर्गनगरी येथे देशातील १६ व्या राष्ट्रीय एससी एसटी हब शाखेचे झाले उद्घाटन ओरोस ता.२६-: देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग मधील नागरिकांमध्ये उद्योजकता संस्कृती जागृत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एससी, एसटी हब २०१६ पासून सुरू केले आहे. त्याची देशातील १६ वी शाखा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी माझ्या सूक्ष्म, लघु आणि…

Read More

आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते कळसुलकर येथे विहिरीचे भूमिपूजन

⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-: कोकण विभाग शिक्षक मतदार संघ शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील यांच्या हस्ते सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी मधील विहिरीचे भूमिपूजन करण्यात आले. बाळाराम पाटील हे कोकण विभाग दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील कळसुलकर प्रशालेस सदिच्छा भेट दिली व शिक्षकांना मार्गदर्शन केले, त्याचबरोबर प्रशालेतील…

Read More

प्रा.हसन खान यांचा कोकणरत्न पुरस्काराने सन्मान

⚡मालवण ता.२५-: महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी द्वारे देण्यात येणारा कोकणरत्न पुरस्कार २०२२ हा मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.हसन युसूफ खान यांना आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन शरद कृषी भवन, ओरोस या ठिकाणी करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्राबरोबर…

Read More

देवली सरपंच शाम वाक्कर यांचे क्रीडा सहकाऱ्यांकडून अभिनंदन

⚡मालवण ता.२५-: देवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या शाम वाक्कर यांची क्रीडा क्षेत्रातील सहकारी व क्रिकेट समालोचकांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. देवली सरपंच म्हणून निवडून आलेले शाम वाक्कर हे कला क्रीडा क्षेत्रात वावरत असून ते स्थानिक क्रिकेट मधील मराठी व हिंदी भाषेचे क्रिकेट समालोचक देखील आहेत त्यामुळे क्रीडा क्षेत्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग…

Read More

जिल्ह्यातील पहिल्या चॉकलेट फॅक्टरीचा शुभारंभ

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला शुभारंभ;श्री गणेश फोटो स्टुडिओचे मालक सुनील कोरगावकर यांचा पुढाकार सावंतवाडी : सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध श्री गणेश फोटो स्टुडीओचे मालक सुनील कोरगांवकर यांच्या पुढाकारातून व त्यांच्या सुनबाई ज्योती सुरज कोरगांवकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गातील पहिली ”चॉकलेट फॅक्टरी” सावंतवाडी तालुक्यात मळगाव येथे सुरु झाली आहे. माजी आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते…

Read More

कळसुळकरचे सहाय्यक शिक्षक गोपाळ गवस यांना कोकण रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील पुरस्कृत कोकण रत्न पुरस्कार २०२२ अंतर्गत शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यबद्दल तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे देण्याच्या कार्यात अग्रेसर भूमिका बजावत असल्याने कोकण रत्न २०२२ आदर्श शिक्षक पुरस्काराने आज शरद कृषी भवन सिंधुदुर्ग नगरी येथे संपन्न झालेल्या…

Read More

कै. दत्ताराम वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेत हर्षिता राऊळ व कु. रेश्मा पालव प्रथम

श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडीच्यावतीने पु. साने गुरूजी जयंती निमित्त स्पर्धेचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२५सहदेव राऊळ-: सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी च्यावतीने प्रति वर्षीप्रमाणे पु. साने गुरूजींच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. हर्षिता सहदेव राऊळ हिने पहिल्या गटात व इन्सुली…

Read More
You cannot copy content of this page