“इयर बडी हेरिंग केअर क्लिनिकचा ” पुढाकार
सावंतवाडी
श्रवण क्षमता कमी आणि वाचा विकार असलेल्या रुग्णांसाठी “इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक”च्या वतीने ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस मोफत तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील हाॅटेल मॅंगो येथील क्लिनिकमध्ये या कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून
इच्छूकांनी येतांना 9309809584 या नंबर फोन करुन आपल्या नावाची बुकींग व वेळ निश्चित करावा असे आवाहन डाॅ. स्वाती भाट यांनी केले आहे.
