भटवाडी येथील माणिक रेसिडेन्सी रहिवाशांनी केला त्यांचा सत्कार
⚡सावंतवाडी ता.२७-: भटवाडी येथील माणिक रेसिडेन्सी येथे गेली अनेक वर्षे नागरिकांना डांबरीकरण रस्त्याच्या प्रतीक्षा होती. अखेर त्याची पूर्तता झाली असून सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी पुढाकार घेऊन तो रस्ता स्वखर्चातून करून दिला आहे. याबाबत नागरिकांनी त्यांचे आभार मानून सत्कार केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेली अनेक वर्ष या रेसिडेन्सी मधील लोकांना मातीच्या रस्त्यातून ये- जा करावें लागत होते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते चलवाडी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ या नागरिकांची समस्या जाणून घेऊन हा रस्ता स्वखर्चातून करून दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.
यावेळी चैताली वाळके, यशवंत घावणे, नारायण नाईक, चेतन वाळके, नरेश डोंगरे, तुकाराम गावडे, तनवी गावडे, संदीप परब, प्रतीक्षा परब, श्वेता पवार, सुरेखा तांडेल, नीरजा डोंगरे, साके पवार, आधी लोक सत्कार समारंभाला उपस्थित होते.
