७५ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव पिल्लांना जीवदान

कासव मित्रांनी सोडले समुद्रात

मालवण दि प्रतिनिधी
दोन महिन्यापूर्वी आचरे येथील कासव मित्रांनी समुद्र किनाऱ्यावर संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ७५ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडण्यात आले.

आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर दोन महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती.कासवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वी समुद्र किनारी संरक्षित करुन ठेवण्यात आली होती. बुधवारी सकाळ पासूनच संरक्षित अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली होती.  आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होतात.

अॕलिव्ह  रिडले ह्या कासव जमातीची कासवे या किनाऱ्यास पसंती देताना दिसत आहेत. तळाशील ते आचरा  कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ ही अंडी न पळवता जतन करत अन्य हिंस्त्र प्राण्यां पासून त्यांचे जतन करत दोन महिन्यानंतर पिल्ले बाहेर पडली की वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडण्यात आली आहेत.

यावेळी वनविभागाचे संजू जाधव, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, शरद धुरी, अजय कोयंडे, जीतेंद्र धुरी, ममता मुळेकर, गणधाली धुरी, गायत्री वाडेकर, स्वप्नील जोशी, नंदू तळवडकर, शुभ्रा धुरी, तृप्ती धुरी, सृष्टी धुरी, चंदना धुरी पिरावाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो
आचरा किनाऱ्यावर संवर्धन केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या ७५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

You cannot copy content of this page