Headlines

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

पी. जे. कांबळे;नगरवाचनालयातर्फे ‘मराठी भाषेची शुद्धता’ विषयावर व्याख्यान

⚡कणकवली ता.२५-: शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लावली. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पी. जे. कांबळे यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कणकवली नगरवाचनालयातर्फे
वाचनलायाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात ‘मराठी भाषेची शुद्धता’ या विषयावर श्री. कांबळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी ते बोलत
होते. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक कार्यवाह हनीफ पीरखान,व्याख्याते पी जे कांबळे,
शिक्षक विकास ठाकूर वृषाली जाधव, ग्रंथपाल राजन ठाकूर सह ग्रंथपाल पल्लवी कोकनी, लिपिक स्नेहा चव्हाण, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
राजभाषा मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने १४ ते २८ जानेवारी या कालवाधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा शासनाचा निर्णय आहे. या मध्ये २०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

You cannot copy content of this page