Headlines

रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

वेंगुर्ला प्रतिनिधी -वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिरात १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. शनिवारी सकाळी धार्मिक विधी, रात्री सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे आगमनानंतर तरंग देवतांसह श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा, त्यानंतर तरंग देवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होईल. रथ प्रदक्षिणेनंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयग होणार आहे. श्रींच्या दर्शनाचा…

Read More

महाशिवरात्री निमित्त मठ स्वयंभू मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी -मठ येथील श्री देव स्वयंभू मंदिरात महाशिवरात्री उत्सवनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींवर लघुरुद्र, अभिषेक, वरदशंकर पूजा, नामस्मरण, सायं.७ वा. दीपोत्सव, रात्रौ ८ वा. ह.भ.प.भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन, रात्रौ १० वा. पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ११.३० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ‘अघोर शिव‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

Read More

दांडी किनारी मंजूर धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांचे येत्या आठ दिवसांमध्ये भूमिपूजन – सन्मेष परब

⚡मालवण ता.१७-:मालवण शहरातील दांडी येथील मोरेश्वर रांज व श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर या दोन ठिकाणी समुद्री धूप प्रतिबंधक बंधारा आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाकडून मंजूर असून या कामांची निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या आठ दिवसात या दोन्ही बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक…

Read More

कुणकेश्वर यात्रेसाठी मालवण आगार सज्ज

मालवण व आचरा येथून २० गाड्यांचे नियोजन ;मालवण आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती ⚡मालवण ता.१७-: देवगड येथील श्री कुणकेश्वर यात्रा उद्या दि. १८ फेब्रुवारी रोजी होत असून यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मालवण एसटी आगारातून कुणकेश्वर यात्रा जादा वाहतूकीसाठी मालवण व आचरा येथून २० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मालवण आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली…

Read More

आंबोली हिरण्यकेशी येथे महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम…

३ बसेसची व्यवस्था:पोलिस बंदोबस्त ठेवणार… आंबोली,ता.१७: येथील हिरण्यकेशी तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी आंबोली ग्रामस्थांनी तयारी केली आहे.विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबोली हिरण्यकेशी हे जागृत तीर्थस्थान आहे.या ठिकाणी हिरण्यकेशी नदीचा उगम सातव्या गुहेत असून शिवलिंग आणि गंगा देवीची आणि श्री गणेशाची मूर्ती आहे.हे प्राचीन देवस्थान आहे. या ठिकाणी जलकुंड आहे त्यात स्नान…

Read More

अपूर्ण रस्त्याच्या कामांसह शौचालयांची कामे पूर्ण करा-:खासदार विनायक राऊत…

ओरोस ता.१७-: वागदे येथील रस्त्याचे अपूर्ण काम तसेच आंबोली येथील सार्वजनिक शौचालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज दिले.

Read More

ओरोस येथील ‘तोंड बंद’ आंदोलनाला लोकशाहीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद…

⚡ओरोस ता.१७-: राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज झालेल्या ‘तोंड बंद आंदोलना’ला लोकशाहीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. भाषणबाजीला पूर्णपणे फाटा देऊन झालेल्या या आंदोलनात सुमारे…

Read More

अखेर ‘ तो ‘ बॅनर हटवला…!

सेनेच्या ‘ त्या’ बॅनर वरून काही काळ राजकीय वातावरण तंग ⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेचे फायर ब्रँड नेते व खासदार संजयराऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात सायंकाळीपाच वाजता स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतीलपटवर्धन चौकामधील ‘ इलाका तेरा धमाका मेरा’ या टॅगलाईन खालचे बॅनर हे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणकरणारे असल्याचे कारण देत हे बॅनर हटवण्यासाठीन.पं.प्रशासन…

Read More

पुणे ते सावंतवाडी कोकण रेल्वे चालू व्हावी

पुणे येथील सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळाने वेधले आम.नितेश राणे यांचे लक्ष ⚡कणकवली ता.१७-: पिंपरी-चिंचवड , पुणे येथे सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळचा स्नेह मेळावा नुकताच थाटामाटात झाला आहे. कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम झाल्यानंतर नितेश राणे यांनी पिंपरी-चिंचवड येथे स्थायिक असलेल्या सिंधुदुर्गवासीय कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन आवर्जून भेट दिली. तसेच त्या ठिकाणी भेटीगाठी दरम्यान गावाकडच्या…

Read More

“इलाका तेरा धमाका मेरा”

कणकवलीतील तो बॅनर ठरतोय लक्षवेधी ⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खास. संजय राऊत हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना कणकवलीत त्यांच्या स्वागतासाठी बॅनर युद्ध सुरू झाले असून कणकवली पटवर्धन चौकात “इलाका तेरा धमाका मेरा” या टॅग लाईन ने युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लावलेला बॅनर हा लक्ष वेधत आहे. कणकवली पटवर्धन चौकात बाजारपेठ रस्त्याच्या सुरुवातीला…

Read More
You cannot copy content of this page