“इलाका तेरा धमाका मेरा”

कणकवलीतील तो बॅनर ठरतोय लक्षवेधी

⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खास. संजय राऊत हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना कणकवलीत त्यांच्या स्वागतासाठी बॅनर युद्ध सुरू झाले असून कणकवली पटवर्धन चौकात “इलाका तेरा धमाका मेरा” या टॅग लाईन ने युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लावलेला बॅनर हा लक्ष वेधत आहे.

कणकवली पटवर्धन चौकात बाजारपेठ रस्त्याच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी खास.संजय राऊत यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्या स्वागत व्यासपीठाच्या समोर लावलेला”इलाका तेरा धमाका मेरा” बॅनर हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इलाका तेरा धमाका मेरा, युवा सेना सिंधुदुर्ग अशा आशयाचा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लावलेला पटवर्धन चौकातील बॅनर हा या स्वागताच्या दरम्यान चर्चेचा विषय बनला आहे.

You cannot copy content of this page