⚡मालवण ता.१७-: बुधवळे कृषी फलोत्पादन विकास सहकारी संघ समितीची पंचवार्षिक निवडणूक २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. मतदान प्रक्रिया सकाळी ८ ते ४ या वेळेत बुधवळे ग्रामपंचायत सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी दिली.
या निवडणुकीसाठी सर्वसाधारण ४, महिला २, अनुसुचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रत्येकी १ अशा जागा आहेत. एकूण मतदार १०७ असून ते ९ जागांवर उमेदवार निश्चित करणार आहेत. इतर मागासवर्गीय मतदारसंघ बिनविरोध झालेला आहे. भटक्या विमुक्त जाती / जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघातून एकही अर्ज प्राप्त नाही. उर्वरित जागांसाठी लढत होत आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी- सर्वसाधारण मतदारसंघ : प्रकाश अंकुश बुधवळेकर, गुरुदास नामदेव घाडी, विश्वास अंकुश हिर्लेकर, कृष्णा अनंत साटम, सुधाकर बाळकृष्ण शिर्सेकर, अभिमन्यू विश्राम येरम, भानुदास आत्माराम येरम. महिला मतदारसंघ सुनंदा रवींद्र घाडी, उल्का उमेश पडवळ, विनया विलास पांगे, इतर मागासवर्गीय मतदारसंघ : राजेंद्र रामचंद्र मुणगेकर. अनुसुचित जाती व जमाती सभासदांसाठी राखीव : संजय बुधाजी कदम, सुभाष लवू कदम.
