⚡सावंतवाडी ता.२०-: निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जन आरोग्य समितीची बैठक संदिप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निरवडे यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णाच्या सोयी साठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी फुमिगेशंन मशीन जिल्हापरिषद सदस्य संदिप गावडे यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्यात आली. सदर बैठकीस सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, निरवडे सरपंच सौ गावडे मॅडम, निरवडे माजी सरपंच हरी वारंग, श्री तानावडे, बाळू साळगावकर, श्री बाळा भगत, श्री विकास गावडे व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. .
संदिप गावडे यांच्या माध्यमातून निरवडे ग्रामीण रुग्णालय येथे फुमिगेशंन मशीन प्रदान…
