Headlines

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शेर्ले येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

⚡सावंतवाडी ता. २०-: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा क्रमांक १, शेर्ले येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ, वृक्षरोपे व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठी पंखा आणि भिंतीवरील घड्याळे देण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी करण्यात आल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे, माजी सरपंच उदय धुरी, दयानंद धुरी, सरपंच प्रांजल जाधव, ग्रामपंचायत सदस्य, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख श्रावणी धुरी, शालेय समिती अध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष उत्कर्षा केरकर, मुख्याध्यापक कराड सर व शिक्षकवृंद, शांताराम धुरी, अनिल पिंगुळकर (शाखाप्रमुख), साहिल खोबरेकर (युवासेना उपतालुकाप्रमुख), धुरी बाई तसेच बाबा धुरी आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page