दांडी किनारी मंजूर धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांचे येत्या आठ दिवसांमध्ये भूमिपूजन – सन्मेष परब

⚡मालवण ता.१७-:
मालवण शहरातील दांडी येथील मोरेश्वर रांज व श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर या दोन ठिकाणी समुद्री धूप प्रतिबंधक बंधारा आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाकडून मंजूर असून या कामांची निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या आठ दिवसात या दोन्ही बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण उपशहर प्रमुख श्री. सन्मेष परब यांनी दिली आहे.

मालवण दांडी मोरेश्वर रांज येथे समुद्र धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी सन २०२०-२१ च्या अर्थ संकल्पात एकूण २ कोटी एवढा निधी, तर अर्थसंकल्प तरतूद सन २०१७-१८ अंतर्गत श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे समुद्र धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्या साठी एकूण १.४५ कोटी एवढा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला होता. आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केल्यानंतर २०१७-१८ व २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय तरतूद अंतर्गत या दोन्ही बंधाऱ्यांना एकूण ३.४५ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. दांडी मोरेश्वर रांज येथे एकूण २२५ मीटर एवढ्या अंतराचा तर श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे १५६ मीटर अंतराचा धुपप्रतिबंधक बंधारं मंजूर करण्यात आला होता. सदर कामांची पर्यावरण विभागाकडून आवश्यक ती परवानगी देखील आम. वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून मिळवली आहे. या कामांची सिंधुदुर्ग पतन विभागाकडून दि. २७ एप्रिल २०२२ रोजी जाहिरात देऊन निविदा मागविण्याची सूचना देण्यात आली. यानुसार आलेल्या कमी दराच्या ई-निविदानुसार क्लासिक इन्फ्रा, नवी मुंबई यांना या कामांची वर्क ऑर्डर देण्यात येईल, अशी माहिती सन्मेष परब यांनी दिली आहे.

येत्या आठ दिवसांमध्ये या दोन्ही बंधाऱ्यांचे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूमिपूजन करण्यात येणार आहे. संपूर्ण दांडीवासीयांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार व्यक्त केले असल्याचेही राजू परब यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page