Headlines

महाशिवरात्री निमित्त मठ स्वयंभू मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी -मठ येथील श्री देव स्वयंभू मंदिरात महाशिवरात्री उत्सवनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींवर लघुरुद्र, अभिषेक, वरदशंकर पूजा, नामस्मरण, सायं.७ वा. दीपोत्सव, रात्रौ ८ वा. ह.भ.प.भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन, रात्रौ १० वा. पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ११.३० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ‘अघोर शिव‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

दि. १९ फेब्रुवारी रोजी स. ९ वा. उत्सवाची सांगता तसेच दुपारी १२ वाजता भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव स्वयंभू (वगैरे) देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीतर्फे केले आहे.
You cannot copy content of this page