अखेर ‘ तो ‘ बॅनर हटवला…!

सेनेच्या ‘ त्या’ बॅनर वरून काही काळ राजकीय वातावरण तंग

⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेचे फायर ब्रँड नेते व खासदार संजय
राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात सायंकाळी
पाच वाजता स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील
पटवर्धन चौकामधील ‘ इलाका तेरा धमाका मेरा’ या टॅग
लाईन खालचे बॅनर हे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
करणारे असल्याचे कारण देत हे बॅनर हटवण्यासाठी
न.पं.प्रशासन कडून हटविण्याच्या बाबतीत हलचाली सुरू आहेत.
त्यामुळे या विषयावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे तर बॅनर हटवण्यास शिवसैनिकांकडून विरोध केला जात आहे. एकीकडे शिवसेना आपल्या बॅनरच्या मुद्द्यावर ठाम असून दुसरीकडे तो बॅनर आता
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने नगरपंचायत कडून तो हटविण्यात आला आहे.

You cannot copy content of this page