Headlines

कणेडी-कुपवाडे-शिवापूर-शिरशिंगे-सांगेली-दणोली-बांदा रस्त्याच्या डागडुजीचे काम प्रगतीपथावर…

सरमळे परिसरातील संरक्षक भिंत व रेलिंगचे कामही १५ ते २० दिवसांत पूर्ण होणार; सार्वजनिक बांधकाम विभागाचे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना पत्र.. ⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुक्यातील कणेडी-कुपवाडे-शिवापूर-शिरशिंगे-सांगेली-दणोली-बांदा कि.मी. १५/६०० ते २२२/८०० या राज्य मार्ग क्रमांक १९० वरील रस्त्याच्या डागडुजी व सुधारणा कामाला गती देण्यात आली असून हे काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.याबाबत कार्यकारी…

Read Full News

सावंतवाडीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम उत्साहात…

भाजपकडून पर्यावरण रक्षणाचा संकल्प || जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वोदय नगर येथे वृक्षारोपण.. ⚡सावंतवाडी ता.०५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथे “एक पेड माँ के नाम” या अभियानांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आयोजित या उपक्रमात कांचन, मोहगणी,…

Read Full News

वीज समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध…

आमदार प्रमोद जठार: पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार.. ⚡सावंतवाडी ता.०५- : २०१४ पर्यंत महाराष्ट्रात १४-१४ तास लोडशेडींग व्हायचं. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर देशात अन् राज्यात आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. ‘वन नेशन, वन ग्रीड’ अंतर्गत सगळी ग्रीड एकमेकांना जोडली गेलीत. वीजेचे आताचे प्रश्न झाड, फांद्या पडल्याने होत आहेत‌. ते सुद्धा मार्गी लागतील. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा…

Read Full News

सावंतवाडीच्या विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी दिली पालिकेला भेट…

नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्याकडून स्वागत; विकासकामांसाठी निधीचे दिले आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.या भेटीदरम्यान शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले सहकार्य आणि निधी उपलब्ध करून…

Read Full News

धाकोरे येथील श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहिमेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०५-: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वच्छता आणि आरोग्य अबाधित राखण्याच्या उद्देशाने, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली धाकोरे ग्रामपंचायत हद्दीत ४ जून रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात, सार्वजनिक ठिकाणी,मंदिर,शाळा,कार्यालय परिसर अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेत व्यापक साफसफाई करण्यात आली.​या मोहिमेत गावाचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री…

Read Full News

नरेंद्र डोंगर होणार ‘प्लास्टिक मुक्त’; वनविभागाची पर्यावरण दिनी मोठी घोषणा…

सिंधुदुर्गात १५ दिवसांत ५ हजार वृक्षांची लागवड; स्वच्छता मोहिमेत ५० गोणी कचरा संकलित.. ⚡सावंतवाडी ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाने पुढाकार घेत प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना पुढे आणली आहे. आज नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम या कार्यक्रमा दरम्यान उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

नरेंद्र डोंगर होणार ‘प्लास्टिक मुक्त’; वनविभागाची पर्यावरण दिनी मोठी घोषणा…

सिंधुदुर्गात १५ दिवसांत ५ हजार वृक्षांची लागवड; स्वच्छता मोहिमेत ५० गोणी कचरा संकलित.. ⚡सावंतवाडी ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाने पुढाकार घेत प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना पुढे आणली आहे. आज नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम या कार्यक्रमा दरम्यान उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

दोडामार्गातील वीज समस्यांवर ५ जूनला निर्णायक बैठक…

ग्राहक, व्यापारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन* ⚡दोडामार्ग,ता.०४-: दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करून त्यावर ठोस मार्ग काढण्यासाठी वीज ग्राहक संघटना, व्यापारी संघटना आणि कसई-दोडामार्ग नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक शुक्रवार, दिनांक ५ जून रोजी दुपारी ३ वाजता कसई-दोडामार्ग नगरपंचायत सभागृहात होणार आहे….

Read Full News

खवल्या मांजराचे खवले व सांबर शिंगे प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर…

⚡कणकवली ता.०४-: खवल्या मांजराचे खवले व सांबराचे शिंगे बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी गणेश प्रदीप शिंदे (रा. पडवे, ता. कुडाळ) याला सावंतवाडी येथील न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ मे रोजी राम वागुंडी…

Read Full News

वाडातरमध्ये बंद घर फोडून पाच लाखांचे मंगळसूत्र लंपास…

⚡देवगड ता.०४-:देवगड तालुक्यातील वाडातर खाडी येथे कालवे व मूळे काढण्यासाठी गेलेल्या वाडातर येथील प्रतिभा प्रदीप चोपडेकर (वय ६८) यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने डल्ला मारून कपाटातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १ जून रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली….

Read Full News

You cannot copy content of this page