Headlines

धार्मिक सलोखा कायम राखण्याचे काम करावे

राष्ट्रवादी कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलची संघटनात्मक बांधणीबाबत आढावा बैठक ⚡सावंतवाडी ता.१५-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलची आढावा बैठक आज संपन्न झाली.या बैठकीत सेलच्या संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा करण्यात आली.पुढील काळात सेलच्या मार्फत विविध उपक्रम विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “देशभरात सुरू असलेल्या धार्मिक…

Read More

आरोस गिरोबा मंदिर येथे उद्या दशावतारी नाट्यप्रयोग

⚡बांदा ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील आरोस गिरोबा मंदिर येथे मंगळवार 16 मे रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त श्री गिरोबा रंगमंचावर रात्री 10 वाजता श्री बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला नाट्यमंडळ कवठी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थप्रसाद व नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात…

Read More

ओसरगाव धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना कामाचा शुभारंभ

⚡कणकवली ता.१५-: ओसरगाव येथील धरणावर धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना करणे कामाचा शुभारंभ आम. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील धरणावर धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना करणे हे काम आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना करणे या कामासाठी सुमारे ७० लाखांचा निधी मंजूर करून देण्यात आला.या शुभारंभ प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष…

Read More

दंगलीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा

नितेश राणे;राऊत यांच्या मुळे ठाकरेंची अवस्था मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर बसण्याची ⚡कणकवली ता.१५-: महाराष्ट्रात हिंदू – मुस्लिम दंगल भडकवण्यामध्ये नेमके कोणाचे प्लॅनिंग चाललेले आहे याचा शोध घ्या. पुढचे वर्ष हे संपूर्ण निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे राज्यात अशांतता निर्माण करायची हिंदू मुस्लिम दंगल भडकवायच्या असा प्रयत्न तर चाललेला नाही ना ? याची चौकशी करा. १३ ऑगस्ट २००४…

Read More

मालवणातील फोवकांडा पिंपळपार ते नाचनोलकर घर रस्त्याची दयनीय अवस्था

⚡मालवण ता.१५-: मालवण शहरातील फोवकांडा पिंपळपार येथून ग्रामीण रुग्णलयाकडून नाचनोलकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याने वाहतूक करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. फोवकांडा पिंपळपार ते नाचनोलकर घरापर्यंत जाणारा रस्ता शहरातील मेढा भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यास मिळतो. मेढा व राजकोट…

Read More

मालवण येथील भैरवी मंदिराचा उद्यापासून वर्धापन दिन सोहळा

⚡मालवण ता.१५-:मालवण येथील संतसेना मार्गावरील नाभिक बांधवांची कुलदैवता देवी भैरवी मंदिरचा १४ वा वर्धापन दिन सोहळा दि. १६ ते २१ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त श्री देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१६ मे रोजी भैरवी मंदिरात होम होणार आहे. यावेळी देवीचा नारळ बदलण्यात येणार आहे. २० रोजी…

Read More

मालवणात १७ रोजी जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळावा

⚡मालवण ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळाव्याचे आयोजन दि. १७ मे रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या स्नेहमेळाव्यासाठी प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह श्रीकृष्ण…

Read More

कृषी विभागामार्फत आता वैयक्तिक शेततळे योजना…

विजयकुमार राऊत; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन ⚡ओरोस ता.१५-: जिल्ह्याची शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. या शेततळ्यातील पाण्याचा वापर करून फळबाग,…

Read More

स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर ३१ मे ला होणार सेवेतून निवृत्त…

⚡सावंतवाडी ता.१५-: गेली २२ वर्षे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रामाणिकपणे सेवा देणारे प्रसुती विभागाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे येत्या 31 मे ला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचे रिक्त पद भरण्यासाठी राजकीय नेते, संघटना आदींनी शासन दरबारी , प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोडामार्ग वासियांची तातडीची गरज म्हणून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून दोडामार्ग या ठिकाणी बदलीपर गेलेले स्त्रीरोगतज्ञ…

Read More

बांद्यात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद..

बांदा ता.१५-: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील बांदा केंद्रशाळेत ही स्पर्धा संपन्न झाली. पहिली ते चौथी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज’ हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात नील बांदेकर, पवित्रा कदम, भक्ती केळुस्कर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. सर्वज्ञ…

Read More
You cannot copy content of this page