मालवणात १७ रोजी जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळावा

⚡मालवण ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळाव्याचे आयोजन दि. १७ मे रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.

या स्नेहमेळाव्यासाठी प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह श्रीकृष्ण साबणे, श्रीमंत खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीचे माजी ग्रंथपाल डॉ. जी. ए. बुवा, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र कामत आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. यामध्ये वाचन संस्कृती वाढीसाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे योगदान हा परिसंवाद होणार आहे. त्यात कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथ संग्रहालया (जिल्हा ग्रंथालय) चे ग्रंथपाल राजन पांचाळ, रामेश्वर वाचन मंदिर, आचराचे ग्रंथपाल विनिता कांबळी, कोलगाव मुक्तद्वार वाचनालयाच्या ग्रंथपाल पूनम नाईक, सानेगुरुजी वाचन मंदिर, मालवणच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर, श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीचे ग्रंथपाल महेंद्र पटेल हे सहभागी होणार आहेत. तसेच ग्रंथालय क्षेत्रात अनेक वर्षे योगदान दिलेल्या निवृत्त ज्येष्ठ ग्रंथालय कर्मचाऱ्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून महात्मा गांधी वाचन मंदिर, माजी ग्रंथपाल अनिल पंडित, माजगाव पंचक्रोशी. मनविकास ग्रंथालय मंडळाच्या माजी ग्रंथपाल श्रीमती मंगल सावंत, श्रीराम वाचन मंदिरचे माजी ग्रंथपाल दीनानाथ नाईक, एस. के. काझी काझीवाडा-आचराच्या वाचनालय, माजी ग्रंथपाल मनिकर्णिका हळदणकर, वासुदेवानंद सरस्वती वाचनालय, माणगावचे माजी ग्रंथपाल विजय केसरकर व श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस वेंगुर्लाचे माजी ग्रंथपाल जयवंत तुळसकर हे पुरस्काराचे मानकरी आहेत.

स्नेहमेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व. सार्वजनिक ग्रंथालयांच्या संस्थाचालकांनी आपले ग्रंथालय १७ मे रोजी बंद ठेवून कर्मचाऱ्यांना उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळावा नियोजन समितीतर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकारी व जिल्हा. ग्रंथालय संघाच्या अध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती नियोजन समिती जिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

You cannot copy content of this page