सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार
⚡कणकवली ता.२३-: कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास सांगली येथील सारांश या आंतरराज्य मासिकाचा राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठ निर्मितीसाठी सुप्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक यांना सारांश मासिकाच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सारांश मासिक चे संपादक डॉ. अनिल दबडे , उपसंपादक डॉ.विजयकुमार माने यांनी…
