मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या १३१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड
⚡मालवण ता.२७-: मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या १३१ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली आहे. पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रिकल-१६, इलेक्ट्रोनिक्स-०८ तसेच मेकॅनिकलच्या ७ विद्यार्थ्याची निवड केली. जॉन डीअर या कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल-०१…
