नडगिवे येथील पाईप लाईनसाठी खोदलेल्या गटाराची बाजूपट्टी करण्याचे आदेश

बांदा सरपंच, उपसरपंच यांना कार्यकारी अभियंता यांची माहिती

बांदा/प्रतिनिधी
गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे खोदाई केल्याने या कंपनीला तात्काळ बाजूपट्टीचे डांबरीकरण करण्याचे आदेश देण्यात आल्याची लेखी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिली आहे. बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी श्रीमती चव्हाण यांची सावंतवाडी येथे भेट घेतली.
बाजूपट्टी खोदण्यात आल्याने बांदा दोडामार्ग रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. यावेळी सावंतवाडीचे माजी नागराध्यक्ष संजू परब, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, रत्नाकर आगलावे आदी उपस्थित होते. यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जोपर्यंत बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा जावेद खतीब व बाळु सावंत यांनी घेतला.
यावेळी अभियंता चव्हाण यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याची परवानगी आपल्या खात्याने दिल्याचे मान्य केले. स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर कंपनीच्या आशिकाऱ्यांना बोलवून समज देण्यात आली असून तात्काळ बाजूपट्टीचे काम पूर्ववत करून देण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. बांदा ग्रामपंचायत शिष्टमंडळाला श्रीमती चव्हाण यांनी लेखी पत्र देऊन माहिती दिली आहे.

You cannot copy content of this page