भाजपातर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.२७-: बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा भाजपातर्फे त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.

  यामध्ये सारिकाकुमारी यादच हिचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते, पुर्वा करंगूटकर हिचा महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, मिताली कोयंडे हिचा तालुकाध्यक्ष सुहास गवंउळकर यांच्या हस्ते, सानिका वरसकर हिचा प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते, ईशा भोसले हिचा तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख, बुथ अध्यक्ष शेखर काणेकर, बुथ अध्यक्ष रविंद्र शिरसाठ, बुथ अध्यक्ष निलेश गवस तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
You cannot copy content of this page