Headlines

राष्ट्रवादी शहर अल्पसंख्या महिला अध्यक्षपदी राबिया शेख आगा…

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अल्पसंख्या महिला अध्यक्षपदी अँड.सौ. राबिया शेख आगा यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना विधी मंडळाचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

Read More

कौले काढत बंद घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न फसला

साटेली भेडशी थोरलेभरड येथील प्रकार:मौल्यवान वस्तू, पैसे घरात नसल्याने चोरट्याने घेतला काढता पाय दोडामार्ग,ता.13-:साटेली भेडशी थोरलेभरड येथील बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न फसला.घटना बुधवारी मध्यरात्री घडली असण्याचा अंदाज आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या छप्पराचे कौले काढत घरात प्रवेश केला; मात्र घरात कोणतीही किमती वस्तू व पैसे नसल्याने त्याने काढता पाय घेतला. असे असले तरी चोरीचा…

Read More

कणकवलीत आ. भास्कर जाधव यांची तोफ धडाडणार

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख उपस्थिती ⚡कणकवली ता.१३-: कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार १४ जुलै रोजी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून कणकवलीत त्यांची तोफ धडाडणार आहे. आ. भास्कर जाधव यांचे सकाळी १०:३० वाजता कणकवली विजय भवन येथे स्वागत केले जाणार आहे. सकाळी ११…

Read More

कोकण संस्थेचा स्तुत्य उपक्रम – गरजू आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡बांदा ता.१३-: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली ११ वर्षे सिंधुदुर्ग, रायगड ,नाशिक, पालघर ,बीड, रत्नागिरी, ठाणे , पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध कार्यक्रम तसेच ग्रामीण भागातील महिलांना अर्थाजनाचे साधन निर्माण व्हावे यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आयोजित केली जातात . विविध सामाजिक उपक्रम करत असताना ज्या गरजू मुलांना शिकण्याची इच्छा…

Read More

सिने – टेली कलाकार सेवा संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी सौ संजना हळदिवे…

⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा येथील कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चैनल च्या संपादिका संजना संजय हळदीवे यांची सिने- टेली कलाकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती सिने- टेली कलाकारसेवा संघाचे पूर्व मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सुनिल गोडबोले, किशोर पाटील, अनामिका सावंत, सचिव डॉ. वैष्णवी बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सिने टेली कलाकार…

Read More

पाडलोस केणीवाडा शाळेस सिलिंग पंखा प्रदान

⚡बांदा ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना अनेक समस्या आहेत. याची दखल घेत केणीवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना सिलिंग पंखा नसल्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजन पटेकर व अमोल नाईक यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस नंबर 2 ला स्वखर्चातून सिलिंग पंखा भेट दिला. तसेच मुंबई येथील वकील प्रेमानंद साळगावकर यांच्या मार्फत आजी-माजी विद्यार्थ्यांना…

Read More

कळणेत १६ जुलै रोजी एकदिवसीय भजन कार्यशाळा

⚡बांदा ता.१३-: कळणे येथील श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ आणि गोव्यातील ख्यातनाम भजनी गायक विठ्ठल शिरोडकर यांच्या शिष्य परिवारातर्फे कळणे येथे एक दिवशीय भजन कार्यशाळा आयोजित केली आहे. कळणे माऊली मंदिर सभागृहात रविवार १६ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे.       या कार्यशाळेला गोव्यातील भजनी कलाकार विठ्ठल शिरोडकर हे…

Read More

मुलांना अभिव्यक्त होऊ द्या…

दिव्य ज्योती प्रशालेत पालकांसाठी डॉ.रुपेश पाटकर यांचे मार्गदर्शन… ⚡बांदा ता.१३-: येथील दिव्य ज्योती स्कूल डेगवे. प्रशालेत मंगळवार दिनांक 11 जुलै रोजी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांचे ‘नव्या युगातील पालकत्व समस्या आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . डॉक्टर पाटकर व्याख्यानात मार्गदर्शनकरताना म्हणाले की,मुलांना एका…

Read More

घरफोडीतील आंतरराज्य गुन्हेगाराला कणकवलीत अटक

स्थानिक गुन्हा अन्वेषणची मोठी कारवाई;३० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त ⚡ओरोस ता.१३-: महाराष्ट्र, गोवा राज्यासह कर्नाटक राज्यात घरफोडीचे ४५ गुन्हे असलेल्या मूळ गोवा येथील फरार आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील ( वय ३७) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कणकवली तालुक्यातील वागदे येथील राहत्या घरातून अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी…

Read More

आरोस विद्या विहार इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

⚡बांदा ता.१३-: विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस विद्यालयात कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या मार्फत आणि आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष निलेश परब यांच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, सदस्य संतोष फणसेकर, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page