Headlines

राष्ट्रवादी शहर अल्पसंख्या अध्यक्षपदी जहूर खान…

⚡सावंतवाडी ता.१३-:सावंतवाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अल्पसंख्या अध्यक्षपदी जहूर खान यांना विधी मंडळाचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांनी नियुक्तीपत्र दिले. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या जहूर खान यांनी सावंतवाडी शहरात राष्ट्रवादी ऊर्जितावस्था आणली.जहूर खान यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेत, पक्ष श्रेष्ठीनी जहूर खान यांची सावंतवाडी शहर अल्पसंख्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.

Read More

सरंबळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

⚡कुडाळ ता.१३-: सरंबळ- परबवाडी येथील नंदकुमार परब यांच्या विहिरीत आज सकाळी बिबट्या पडल्याची घटना घडली. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. काही वेळात रेस्क्यू टीम सहित वनपाल अमित कटके, वनपाल अनिल राठोड, वनपाल सावळा कांबळे, वनपाल महेश पाटील, डीसीए रेड्डी, एसीसी लाड घटनास्थळी दाखल झाले. या टीमने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्याद्वारे सुखरूप बाहेर काढले. सदर…

Read More

सिंधुदुर्गातील 15 हजार लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना अभियानचे प्रदेश सचिव नारायण सावंत यांची माहिती ⚡दोडामार्ग,ता.13-: प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान मार्फत जिल्ह्यातील पंधरा हजाराहून अधिक लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला. अभियानचे प्रदेश सचिव नारायण सावंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण सावंत यांची भेट घेऊन अभियानाच्या कामाचा अहवाल सादर केला. केंद्र शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना…

Read More

श्री रामेश्वर सप्ताहाची उत्साहात सांगता

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराच्या सुरू असलेल्या प्रसिद्ध अखंड भजनी सप्ताहाची सांगता काल्याच्या पालखीने ११ जुलै रोजी मोठ्या उत्साहात झाली. ४ ते १० जुलै या कालावधीत पारंपरीक अष्टोप्रहर भजनांसोबतच तालुक्यातील वारकरी व संगीत मंडळांची भजने संपन्न झाली. तर रामेश्वर व राम मंदिरात पौराणिक कथांचा प्रसार करणारे देखावेही साकारण्यात आले होते. सप्ताहाचे खास आकर्षण…

Read More

मळगाव येथे १५ जुलै रोजी गुरु अभिवादन सोहळा…

श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्यावतीने आयोजन:संगीत श्रोत्यांनी लाभ घेण्याचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: श्री सद्गुरू संगीत विद्यालय (संचालक संगीत अलंकार श्री दिप्तेश मेस्त्री) च्यावतीने तळवडे, कुडाळ, सावंतवाडी, म्हापसा गोवा, न्हावेली गुरुकुल आदी क्लासचा एकत्रित गुरु अभिवादन सोहळा शनिवार १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मळगाव येथील भगवती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानचे…

Read More

वैभववाडी तालुका ह्यूमन राईटने घेतली पोलीस निरीक्षक फुलचंद भेंगडे यांची भेट…

पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्यावतीने करण्यात आले स्वागत ⚡वैभववाडी ता.१३-: वैभववाडी तालुका ह्यूमन राईट असो.फाॅर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वैभववाडी पोलिस स्टेशनचे नव्याने पदभार स्विकारलेले पोलीस निरीक्षक फुलचंद भेंगडे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक,जिल्हाध्यक्ष मंदार काणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर,वैभववाडी तालुकाध्यक्ष संजय शेळके,निरिक्षक प्रकाश माईणकर,महिला संघटक…

Read More

वैभववाडी तालुका ह्यूमन राईटच्यावतीने नवोदित तहसीलदार दिप्ती देसाई यांचे स्वागत…

⚡वैभववाडी ता.१३-: वैभववाडी तालुका ह्यूमन राईट असो.फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने तालुका पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वैभववाडी तालुक्याचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या तहसीलदार सौ दिप्ती.देसाई यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्या सोबत संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नावरती चर्चा करण्यात आली.यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक,जिल्हाध्यक्ष मंदार काणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर,वैभववाडी तालुकाध्यक्ष संजय शेळके,निरिक्षक प्रकाश…

Read More

मोती तलावात बुडणाऱ्या त्या वृद्धेसाठी ते आले देवदूत बनून धावून

पोलीस व माजी नगरसेवकाने वाचविले प्राण ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील मोती तलावात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला सावंतवाडी पोलिसांसह माजी नगरसेवकांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना आज सकाळी न्यायालयाच्या आवारात घडली. माजी नगरसेवक सुरेश भोगटे पोलीस कर्मचारी प्रवीण वालवालकर जगदीश दूधवाडकर यांनी आपला जीवावर बेतून तिला वाचविले. शोभा आत्माराम नाईक रा. खासकीलवाड असे तिचे नाव असून तिला…

Read More

मंजिरी परब यांचे अल्पशा आजाराने निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोलगांव येथील श्री सातेरी कोलगाव ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे सल्लागार व मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते गुरुनाथ परब यांच्या पत्नी सौ. मंजिरी गुरुनाथ परब यांचे बुधवारी निधन झाले. निधना समयी त्या ६३ वर्षांच्या होत्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी शिवसेना पक्षांतर्गत समाजसेवेत स्वतःस झोकून दिले. जोगेश्वरी येथील…

Read More

कोनाळकट्टा येथे झाड पडल्याने दोडामार्ग कोल्हापूर मार्ग बंद

वाहनांच्या रांगा;रस्ता खुला करण्याचे प्रयत्न ⚡दोडामार्ग,ता१२-: कोनाळकट्टा येथे रस्त्यात झाड पडल्याने दोडामार्ग तिलारी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.त्यामुळे रस्त्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.स्थानिक ग्रामस्थ झाड तोडून रस्ता खुला करण्याचे प्रयत्न करीत आहेत.त्या परिसरात संध्याकाळी सव्वा सातच्या दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता.त्यावेळी रस्त्यालगतचे झाड रस्त्यात कोसळले आणि त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली.गेल्या काही…

Read More
You cannot copy content of this page