सावंतवाडी ता.१७-: समाजकारण ते राजकारण असे वाटचाल करत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाला साजेसे काम करत तालुक्यात राष्ट्रवादीची घौडदौड सुरू ठेवण्याचे काम पुंडलिक दळवी यांनी सुरु ठेवले आहे. तालुक्यासह सावंतवाडी शहरात जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासह सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात अगदी अल्पावधीतच त्यांनी जनसामान्यांच्या हृदयात ‘जनसेवक’ म्हणून त्यांनी घर केलं आहे. आज त्याचा वाढदिवस साजरा होत असतांना त्यांना ‘ग्लोबल महाराष्ट्र’कडून खुप खुप शुभेच्छा…!!
पुंडलिक दळवी हे सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तीमत्व. शुन्यातून विश्व निर्माण करणं हा त्यांचा स्थायीभाव आहे. आपल्या जीवनप्रवासासह राजकीय जीवनात त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं आहे. मेहनत, चिकाटीच्या जोरावर गरिबीवर मात करत यशाची शिखर त्यांनी पादाक्रांत केलीय. मात्र, त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेस त्यांनी सुरुवात केली. गेल्या १५ वर्षात सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल कार्य केल. समाजकारणासह राजकारणाची आवड असल्यानं लोकांच प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच ‘घड्याळ’ हाती बांधल. सावंतवाडीतून संपलेल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानं त्यांची थट्टा उडवली गेली. परंतु, कुशल संघटन कौशल्य, मैत्रीपूर्ण स्वभाव अन् समाजासाठी काम करण्याचा ध्यास यावर त्यांनी राष्ट्रवादीला उभारी दिली. नेत्या अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकित नगराध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव चर्चेत होत. मात्र, महाविकास आघाडीचा धर्म पाळत, पक्षादेश मानत त्यांनी मोठ्या मनाने निवडणूकीतून माघार घेतली. त्यानंतर पक्षान उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली. युवा वर्गाला आकर्षित करत आपल्या कुशल नेतृत्वाची झलक यावेळी त्यांनी दाखवून दिली. संपलेली राष्ट्रवादी पुन्हा जोमान उभी राहु लागली. राष्ट्रवादीच्या राज्यातील बड्या नेत्यांच कोकणाकडे वळलेले पाय हे याचंच फलित आहे. यानंतर पक्षश्रेष्ठींनी सावंतवाडीच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दळवींकडे सोपविली. विशेष म्हणजे लग्नाच्या वाढदिनी त्यांना हे मोठ गिफ्ट दिल. यानंतर तालुकावार दौरे करत सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या पुढाकारातून राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल. यावेळी सुद्धा सत्तेत असल्याच विसरून प्रसंगी रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना न्याय दिला. त्यामुळेचं पुंडलिक दळवी हे सर्वसामन्यांना हक्काचे, आपले वाटू लागले. त्यांच्या पॉवरफुल्ल कार्यपद्धतीमुळे कार्यकर्त्यामध्ये चैतन्य निर्माण झाल. राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासोबतीन त्यांनी सिंहाचा वाटा उचलला.
कोरोनाकाळात सामाजिक कार्याबरोबरच गरजू लोकांचे आधार म्हणून ते उभे राहिले. कोरोनात कमतरता असणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा पुरवठा करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यातच कोकणात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आलेल्या पूरस्थितीमुळे कोकणवासिय अडचणीत सापडले. तौक्ते वादळ, अतिवृष्टीनंतर थेट मैदानात उतरत त्यांनी जनतेला मदत केली. जनतेच्या भावना जाणून घेत सरकारच्या माध्यमातून मदत देण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला. बांदा, इन्सुली सारख्या नदी किनारी असणाऱ्या भागात फायर बोट, लाईफ जॅकेट, सायरन प्राप्त करून देण्याचं काम केले. गरजू लोकांना मदतीचा हात दिला. जिथ प्रशासन पोहोचल नाही तिथं पुंडलिक दळवी पोहोचले. म्हणूनच संकटकाळात धावून येणारा ‘पुंडलिक’ म्हणून त्यांची ओळख झाली. सावंतवाडी शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रसंगी आंदोलन देखील छेडली. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी आपली भुमिका कायम ठेवली. शहरातील मुलभूत समस्या, रूग्णालयातील असुविधां पूर्ण करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. पक्षाच्या योजना, धर्माधिकारी प्रतिष्ठानच आध्यात्मिक, सामाजिक व्रत, अर्चना फाउंडेशनचे उपक्रम घराघरात पोहोचवत नागरिकांना लाभ देण्यासाठी त्यांचा विशेष भर असतो. राजकारणापेक्षा जनसेवेसाठी त्यांचा अधिक भर असतो. म्हणूनच त्यांनी जनतेच प्रतिनिधित्व करावं अशी मागणी जनसामान्यांतून केली जात आहे.
