राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी यांच्या वाढदिनी मुलगी श्रिया दळवी हिने जपली सामाजिक बांधिलकी
⚡सावंतवाडी ता.१८-: येथील नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचे गेले दोन महिने पगार झाला नसल्याने त्यांच्यावर आर्थिक टंचाई ओढवली आहे. परिणामी त्यांना कुटुंब चालवणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची कन्या श्रिया दळवी हिने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त या कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी, जॉनी डिसोजा आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व कर्मचारी मोठे संख्येने उपस्थित होते.
