राजन तेलींचा आरोप: 20 मार्चला निघणार लॉंग मार्चला भाजप सहभागी होणार
सावंतवाडी ता.
आडाळी एमआयडीसीतील प्लाॅट कोणाला वितरित करु नका त्या ठिकाणी मोठा उद्योजक येणार आहे असे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्र्याकडे दिल्यानेच तेथे कोणीही उद्योजक आले नाही असा आरोप आज येथे माजी आमदार राजन तेली यांनी केला.
मात्र आम्ही केलेले प्रयत्न येथे तोकडे पडले त्यामुळे शासनाच्या विरोधात नाही परंतू लक्ष वेधण्यासाठी जे सरपंच पुढे आले त्यांच्या २० मार्चला निघणाऱ्या लाँग मार्चला भाजपा म्हणून आम्ही सहभागी होणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे सांगितले.
