स्वीकृत नगरसेवकासाठी केलेली शिफारस दिपक केसरकर यांनी विसरु नये…

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ; पुंडलिक दळवींचा वाढदिवस उत्सवात साजरा..

⚡सावंतवाडीत ता.१८-: “स्वीकृत”नगरसेवक झालेले दीपक केसरकर यांनी आता टनाटन उड्या मारू नयेत,त्यांना स्वीकृत नगरसेवक करून घेण्याची दिलीप नार्वेकर यांच्याकडे मी शिफारस केली होती त्यामुळे त्यांनी भूतकाळ विसरू नये असा टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज लगावला.दरम्यान तुमच्या मंत्री पदाचा फायदा सावंतवाडी मतदारसंघाला काय झाला..? मल्टीस्पेशालिटी, पंचायत समिती कार्यालय इमारत यासारखे अनेक प्रश्न अद्याप देखील मार्गी लागले नाहीत, प्रत्येक कामात त्यांचा खोडा असतो अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.ते तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी. पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस पदाधिकाऱ्यांचे उपस्थिती उत्सवात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रवीण भोसले पुढे बोलताना म्हणाले साडेबारा हजार एकर जमीन मुख्यालय दिली, सोळा एकर जमीन आयटीआय ला दिली त्यात माझा एक तरी गुंठा आहे का असा सवाल देखील प्रवीण भोसले यांनी यावेळी केला.दरम्यान 55 हजार हेक्टर जमीन सिंधुदुर्ग शंभर टक्के अनुदान फल उत्पादन योजना शरद पवार यांनी राबवली याचा मोठा फायदा शेतकरी बागायतदारांना झाला असा दावा देखील प्रवीण भोसले यांनी यावेळी केला. त्यामुळे केसरकर हे प्रत्येक स्वार्थासाठी आपल्या मंत्रिपदाचा फायदा करतात अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली तर भविष्यात मोदीं शाहा सारखे नेते नको तर शरद पवारांसारखे सोज्वळ नेते हवेत आणि त्यांचे कार्यकर्ते पुंडलिक दळवी सारखे निष्कलंक हवेत असे शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी अमित सामंत,शहराध्यक्ष देवा टेंमकर,तालुका चिटणीस हिदायतुल्ला खान,समीर वंजारी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित मान्यवर यावेळी मोठे संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page