⚡कणकवली ता.१८-: मणिपूर येथे गेले दोन महिने दलित, आदिवासी, मागासवर्गीयावर होणाऱ्या अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यासंबंधीचे पत्र शिवाजी राठोड नायब तहसीलदार,कणकवली यांना देवून मणिपूर हत्याकांड प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव,खजिनदार दत्ता पवार, चिटणीस.बी.एस.कदम आणि कार्यकारिणी सदस्य राजेश कदम आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या देशातील एकूणच अराजक परिस्थिती, दलितांवर होणारे अत्याचार, हत्याकांड दिवसेंदिवस वाढत चालले असताना इथली समाजव्यवस्था संवेदनाहीन बनत चालली आहे. अशा अमानवी आणि दहशतवादाविरुद्ध सर्व स्तरातून आवाज उठविण्याची गरज आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळींमधील कार्यकर्त्यांनी सारे मतभेद विसरून अशा अमानुष प्रवृत्तींवर,पाशवी मनोवृत्तीवर वेळीच आळा घालायला हवा, यासाठी सिंपन प्रतिष्ठान मुंबई नेहमीच समाजात घडणाऱ्या अपप्रवृत्तींवर, महिलांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत आहे.
मणिपूर येथील घडलेल्या या लांछनास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी तहसिलदार कणकवली येथे नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांची संस्थेचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन सिंपन प्रतिष्ठान, मुंबई च्या निषेध पत्र देण्यात आले.आणि सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
